Raj Kundra talked about Shah Rukh Khan : बिझनेसमॅन आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान, राज कुंद्रानं त्याचा चेहरा दाखवला. यासोबत त्याच्या 'यूटी 69' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तुरुंगात घालवलेले तिथे त्याचे दिवस कसे होते हे दाखवले. इतकंच नाही तर मास्क काढल्यानंतर राज कुंद्रा खूप रडला. त्यानं म्हटलं की मला जे बोलायचं ते बोला पण माझ्या पत्नी आणि मुलांना आणि माझ्या कुटुंबाला काही बोलू नका. त्यांनी काय बिघडवलं आहे. याशिवाय त्यानं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे.
राज कुंद्रानं त्याच्या चित्रपटाविषयी सांगत म्हटले की 'त्यानं 'यूटी 69'... यूटीचा अर्थ अंडर ट्रायल आणि जेव्हा मी अंडर ट्रायल होतो तेव्हा मला 69 नंबर देण्यात आला होता. जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी 69 चा अर्थ सर्च केला. मला एक गोष्ट कळली की हा एक एंजल नंबर आहे. याचा अर्थ संतुलन आणि शांती आहे. त्यामुळे 'यूटी 69'.'
त्यात राजनं एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख खानचा उल्लेख केला. राजनं म्हटलं की 'भारत आणि बॉलिवूडमध्ये फक्त दोनचं गोष्टी विकल्या जातात, एक शाहरुख आणि दुसरं सेक्स'. राज कुंद्राचा चित्रपट 'यूटी 69' हा तीन नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात त्याला कोण-कोणत्या गोष्टींचा सामना करण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहे. असं म्हटलं जातं की या चित्रपटातून राज कुंद्रा त्याच्यावर असलेल्या आरोपांवर उत्तर देणार आहे. इतकंच नाही, तर तो त्याची प्रतिमा साफ करण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. मात्र, आतापर्यंत अधिकृतपणेपणे या गोष्टीची पुष्टी केलेली नाही. राज कुंद्राचा हा चित्रपट शाहनवाज अलीनं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा : ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार
याशिवाय राज कुंद्रानं हा देखील खुलासा केला की जेव्हा त्यानं त्याच्या तुरुंगातील दिवसांवर चित्रपट बनवण्याचे ठरवले तेव्हा शिल्पा शेट्टीनं त्याच्यावर चप्पल फेकून मारली होती. "मी जेव्हा तिला हे सांगितलं तेव्हा ती माझ्यापासून बऱ्याच अंतरावर उभी होती. मी पहिल्यांदाच याबद्दल तिला विचारत होतो त्यामुळे मी तिच्याकडे पाठ करुन हे बोललो आणि तिच्या फार जवळ जाण्याच्या विचारही केला नाही. माझ्याकडे एक स्क्रीप्ट आहे असं मी तिला सांगितलं अन् तिच्या प्रतिसादाची वाट पाहू लागलो. मी जसं तिच्याकडे तोंड फिरवलं तशी एक चप्पल माझ्या तोंडावर पडली. तेव्हा मला वाटलं की हा चित्रपट निर्माण करता येणार नाही. तेव्हा मी माझ्या दिग्दर्शकाला बोलावलं आणि त्यानेच शिल्पाला या चित्रपटासंदर्भात समजावलं. कारण तिला ही गोष्ट मला समजावता येत नव्हतं".