'...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं

Mukesh Khanna Targets BJP over Ram Mandir : अयोध्येचा लोकसभा निवडणूक 2024 च्या निकाला आल्यानंतर मुकेश खन्ना यांनी साधला भाजपावर निशाणा

दिक्षा पाटील | Updated: Jun 6, 2024, 07:14 PM IST
'...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं title=
(Photo Credit : Social Media)

Mukesh Khanna Targets BJP over Ram Mandir : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आल्यानंतर हे चित्र स्पष्ट झालं आहे की भाजपाच्या हातून यंदाच्या वेळी अनेक सीट्स या मिळाल्या नाही. त्यापैकी एक म्हणजे राम मंदिर असलेलं अयोध्या हे ठिकाण. या ठिकाणासाठी भाजपा सगळ्यात जास्त कॉन्फिडेन्ट होती. फैजाबादच्या मतदार संघातून भाजपाचे लल्लू सिंह हे पराभूत  झाले. तर या पराभवावर कमेंट करत छोट्या पडद्यावरील शक्तिमान अशी ओळख असणाऱ्या मुकेश खन्ना यांनी भाजपावर कमेंट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पराभवातून मिळालेल्या एका शिकवणीविषयी सांगितलं आहे. 

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राम मंदिरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला शेअर करत कॅप्शनमध्ये भाजप सरकारसाठी एक मेसेज दिला आहे. त्यांनी एक कॅप्शन दिला आहे की अयोध्येच्या निवडणूकीत अपयशानंतर ही शिकवण घ्यायला हवी की 'भव्य मंदिराच्या आजुबाजूला असलेल्या लोकांचं आयुष्य देखील भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते चार धाम असो किंवा मग जयपुरच्या जवळ असलेलं निकट खाटू शाम मंदिर असो. श्रद्धेच्या ठिकाणांना टूरिस्ट स्पॉट बनवू नका. तिथे इतर लोकं राहतात त्यांची पण काळजी घ्या.' अशा प्रकारे मुकेश खन्ना यांनी भाजपच्या पराभवावर त्यांचं मत मांडलं आहे आणि निवडणूक असते त्या ठिकाणीच्या लोकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अयोध्येतील या मंदिराच्या निर्माणानंतर सगळ्यांना वाटलं होतं की इथे भाजपचं निवडूण येणार पण त्याच्या विरुद्ध घडलेलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : CISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा

मुकेश खन्ना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकेश यांनी या आधी देखील सोशल मीडियावर देश आणि इंडस्ट्रीशी संबंधीत अनेक मुद्यांवर स्पष्टपणे त्यांचे विचार मांडले आहेत. त्यामुळे अनेकदा ते अडचणीत अडकले आहेत. मुकेश खन्ना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील त्यांची मतं मांडताना दिसतात. मुकेश खन्ना इन्स्टाग्रामवर लोकप्रिय आहे. त्यामुळेच ते सतत चर्चेत राहतात. त्याशिवाय त्यांच्या यूट्युब चॅनलवर सक्रिय असतात. त्यांच्या या युट्यूब चॅनलचं नाव 'भीष्म इंटरनॅशनल' आहे. काहीही झालं तरी मुकेश खन्ना यांना त्यांच्या शक्तिमान या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. त्यांचे आजही लाखो चाहते आहेत.