GOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर

Katrina Kaif Pregnancy: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत.

Updated: Mar 12, 2024, 05:23 PM IST
GOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर title=

Katrina Kaif Pregnancy News:अभिनेत्री कतरिना ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर कतरिनाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कतरिनाच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना फार आवडतं. कतरिना कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कतरिना तिचे फोटो व्हिडीओ सतत तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना प्रेग्नंट असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. नुकतेच कतरिनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री एअरपोर्टवर खूप लूज पोलका डॉट ड्रेस परिधान करुन स्पॉट झाली होती. ज्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र, कतरिना कैफने पुन्हा एकदा या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. 

कैटरीना कैफने स्पोर्टी कपडे परिधआन करत अफवा फेटाळून लावल्या  

कतरिना कैफ दिल्लीत एका क्रिकेट मॅचमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचली होती. यावेळी कतरिना आपल्या टीमची जर्सी आणि जीन्समध्ये दिसली. कतरिनाने आपल्या स्पोर्टी अवतारासोबत पुन्हाएकदा आपल्या प्रेग्नंसीच्या अफवांवर पुर्णविराम दिला आहे. कतरिना कैफ यावेळी टीमला चिअरअप करण्यासाठी पोहचली होती. यावेळी अभिनेत्री एकदम फिटही दिसत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिनाने मॅचमध्ये प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं
मॅचमध्ये कतरिनाने आपल्या उपस्थितीत प्रत्येकाच लक्ष वेधून घेतलं. मॅचच्या दरम्यान आपल्या वीआईपी बॉक्समध्ये बसलेल्या या बॉलिवूड स्टारकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. यादरम्यान तिथे उपस्थित असलेली अभिनेत्रीचे चाहते  कतरिनाचं नाव घेत तिला जोर-जोरात चिअर करत होते. यावेळी अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना स्माईल देत  आणि हात दाखवत चिअर केलं. कतरिनाने फॅन्सचा फोन घेवून त्यांच्यासोबत सेल्फीदेखील क्लिक केला. अभिनेत्रीचं हे जेस्चर चाहत्यांची मने जिंकत होती. 

कतरिना कैफच वर्क फ्रंट
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, कतरिना शेवटची विजय सेतुपतीसोबत फिल्म 'मेरी ख्रिसमस' मध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. नुकताच हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. इतकंच नव्हेतर कतरिनाचा हा सिनेमा ओटीटीवर हिट होताना दिसत आहे.