उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य का नव्हत? CM फडणवीसांनीच दिलं उत्तर

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (१० जानेवारी) विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यावेळी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 11, 2025, 10:26 AM IST
उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य का नव्हत? CM फडणवीसांनीच दिलं उत्तर  title=
Why is there no smile on Eknath Shindes face after become deputy cm devendra fadanvis gives answer

Devendra Fadanvis: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यावरुन बराच खल झाला. त्यातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते, अशा चर्चाही समोर आल्या होत्या. मात्र भाजपला ते मान्य नव्हता म्हणून महायुतीत नाराजीनाट्य असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र एका मुलाखतीत मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यावर भाष्य केले आहे. नागपुरात जिव्हाळा पुरस्काराचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विवेक घळसासी यांनी मुलाखत घेतली. तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? याबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिलं की, 'निकाल लागल्यानंतर साधारणपणे शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होईल असं वाटत होतं. पण ते सहाजिकच होतं. कारण ते मुख्यमंत्री होते, आमचं युतीचं सरकार होतं. मला देखील कल्पना नव्हती मी मुख्यमंत्री होईन. मात्र जनतेने कौलच असा दिला की 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री न करणं जनतेलाही आणि पक्षाील कार्यकर्त्यांनाही आवडलं नसते. त्यामुळं आपल्या पक्षातील वरिष्ठांनी शिंदे साहेबांशी चर्चा केली.' 

'शिंदे साहेबांनी एका मिनिटांत सांगितली की भाजपच मोठा पक्ष आहे. हे मला समजतंय आणि भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. माझी काहीच हरकत नाही,' असं फडणवीसांनी म्हटलं आहे. माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असते. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर फार हास्य कधीच नसते. मुख्यमंत्री असतानाही त्यांचा तसाच चेहरा होता. मात्र तेव्हा कोणी तसा अर्थ लावला नाही. पण उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर ते हसतच नाहीत ते नाराज आहेत ,' असा तर्क लावला, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हावे की नाही? हा मोठा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. त्यावेळी ते निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यामुळे माध्यमांमध्ये बातम्या सुरु झाल्या. त्यावेळी मी त्यांच्यांशी चर्चा केली. माझा अनुभव सांगितला. त्यांना सांगितलं की, तुम्हाला पक्ष चालवायचा आहे. फुट पडल्यानंतर शिवसेना नवीन पक्ष आहे. या परिस्थितीत सत्तेच्या बाहेर राहून पक्ष चालवणे अवघड जाईल. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आले तर पक्षासाठी ते फायद्याचे असणार आहे. त्यांना सरकारमध्ये येण्याचे महत्व पटवून दिले. अखेर त्यांनी ते मान्य झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.