मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिच्या बॉलिवूड कारकिर्दीची जितकी चर्चा केली जाते, तितकंच तिच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच चर्चा केल्या जातात. रवीनाच्या खासगी आयुष्यातील काही पैलू असे आहेत, ज्याबाबत तशी कमीच चर्चा होते. पण, हे पैलू खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहेत.
रवीना अवघ्या 21 वर्षांची असताना आई झाली होती. तिनं केव्हाही आपल्या या निर्णयाची चर्चा केली नाही. उलट आई म्हणून ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना दिसली.
रवीनानं ऐन तारुण्यातच आपल्या Cousin च्या दोन मुली, छाया आणि पूजा यांना दत्तक घेतलं होतं.
बॉलिवूडमध्ये फार लोकप्रिय नसतानाच्याच दिवसांमध्ये तिनं हा निर्णय़ घेतला होता.
रवीनाची मुलगी पूजा ही तिच्याहून अवघी 11 वर्षे लहान आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या मुलीनं एका बाळाला जन्म दिला. ज्यामुळं रवीना 46 व्या वर्षी आजी झाली.
मुलींशी आपण आईप्रमाणे वागत असलो, तरीही हे नातं मैत्रीच्या पायावर आणखी भक्कम झालं आहे, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रवीनानं ज्यावेळी या दोन्ही मुलींना दत्तक घेतलं तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली.
रवीनाच्या लग्नानंतर या मुलींचं काय होणार, असा प्रश्नही अनेकांनीच विसचारला. पण, आपल्यालाशी जो कोणी लग्न करेल त्यानं मुली आणि पाळीव श्वानाचाही स्वीकार करावा अशी अटच रवीनानं ठेवली होती.
रवीनाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, ज्यामुळं तिला काही अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, प्रत्येक प्रसंगी ती मोठ्या धीरानं उभी राहिली आणि परिस्थिती निभावून नेली.