मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाचे वारे वाहात आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोघे लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असताना दुसरीकडे विकी आणि कॅटने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. पण दोघांच्या मित्रमंडळ आणि सूत्रांकडून त्यांच्या लग्नाला शिक्कामोर्तब लागला आहे. असं असताना आता अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाने देखील कतरिना आणि विकीच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
आयुष्मान त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'चंडीगड करे आशिकी' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आयुषमानने कतरिना आणि विकीच्या नात्याबद्दल खुलासा केला. मुलाखती दरम्यान आयुषमानला एक प्रश्न विचारण्यात आला, जर तुला कोणत्या अभिनेत्रीला डेट करण्याची संधी मिळाली तर कोणाला डेट करायला आवडेल?
त्यानंतर आयुषमान समोर अभिनेत्री कतरिना कैफचं नाव घेण्यात आलं. यावर अयुषमान विचार करत असताना समोरचा व्यक्ती म्हणाला, 'तू फार विचार करत आहेस, ती दुसऱ्यासोबत निघून जाईल...' यानंतर आयुषमान म्हणाला, 'ती निघून गेली आहे...' सध्या आयुषमानच्या कतरिना कैफ प्रती असलेल्या भावना तुफान व्हायरल होत आहेत.