कंगनापाठोपाठ 'क्वीन'मधील आणखी एका अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर आरोप

या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Updated: Oct 10, 2018, 02:11 PM IST
कंगनापाठोपाठ 'क्वीन'मधील आणखी एका अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर आरोप title=

मुंबई: लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे दिग्दर्शक, निर्माता विकास बहल सध्या चांगला अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. 'फँटम फिल्म्स'मध्ये काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 
अभिनेत्री कंना रणौतने त्या महिलेच्या आरोपांना दुजोरा देत विकासने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट केलं. एका प्रकारे बी- टाऊनमधील एका कटू प्रसंगाविषयी तिने वक्तव्य केलं. 

विकासवर कंगनाने आरोप केल्यानंतर बऱ्याच चर्चांनी डोकं वर काढलं. त्यातच आता नव्याने भर पडली आहे ती म्हणजे 'क्वीन'मधील आणखी एका अभिनेत्रीची. 

'क्वीन' चित्रपटात कंगनाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत झळकलेल्या नयनीने चित्रीकरणादरम्यानच विकासने एकदा आपला हात पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 

विकासचं हे वागणं पाहून नयनीने त्याला तंबीही दिली होती. परिणामी चित्रीकरणादरम्यान विकास तिच्याशी विचित्र वागू लागला होता. वेळोवेळी तिचा अपमान करु लागला होता. 

विकास बहल ने शूटिंग में पकड़ लिया था मेरा हाथ, एक और एक्ट्रेस ने किए नए खुलासे

हॉटेलच्या रुममध्ये येण्याची ऑफरही दिली

नयनीने विकासबद्दल आणखी एक बाब सांगितली. 

क्वीनच्याच चित्रीकरणाच्या वेळी ती आणि विकास एका २ स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. ते दोघंही वेगवेगळ्या रुममध्ये होते. पण, आपल्याला हॉटेलमध्ये संकोचल्यासारखं वाटत असल्याचं नयनीने त्याच्या लक्षात आणून दिलं. 

नयनीने असं सांगताच तू माझ्यासोबत रुममध्ये ये, असं विकासने तिला सांगितलं होतं.  

'क्वीन'च्या कॉस्च्युम डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीशीही तो फ्लर्ट करत असल्याचं नयनीने सांगितलं. 

विकासबद्दल करण्यात आलेले हे गौप्यस्फोट आणि त्याच्यावरी आरोप पाहता आता #MeToo चा चांगलाच भडका उडाला आहे असंच म्हणावं लागेल.