ऋषी कपूर यांच्या केसांच्या रंगबदलाचं हे आहे खरं कारण ?

काय आहे खरं कारण 

ऋषी कपूर यांच्या केसांच्या रंगबदलाचं हे आहे खरं कारण ? title=

मुंबई : ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून आपल्या चाहत्यांना आपण परदेशात मेडिकल ट्रिटमेंट करता जात असल्याचं सांगितलं. लवकरच आपल्या आरोग्याशी संबंधीत माहिती देऊ असही ते म्हणाले. पण मध्ये अशी माहिती मिळाली की, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं, 

आता न्यूयॉर्कमधून ऋषी कपूर, सोनाली बेंद्रे आणि प्रियंका चोप्रा यांचा फोटो शेअर करण्यात आला. यामध्ये प्रियंका, नीतू, सोनाली ऋषी कपूरसोबत बसल्या आहेत. मात्र लोकांच संपूर्ण लक्ष हे एकाच रात्रीत सफेद झालेल्या ऋषी कपूर यांच्या केसाकडे गेली आहे. आणि त्यानंतर प्रत्येकाने आपले तर्क लावायला सुरूवात केली आहे. 

पण आता समोर आलं आहे की त्यांच्या केसांचा रंग हा कोणत्या आजारामुळे नाही तर. आगामी सिनेमाकरता ऋषी कपूर यांनी आपल्या केसांचा रंग बदलला आहे. मी माझ्या केसांना ऐवा कॉन्ट्रॅक्टरद्वारे पोड्यूसर हनी त्रेहानच्या सिनेमाकरता डाय केले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन हितेश भाटीया करत आहे. या सिनेमाचं अद्याप नाव ठरलेलं नाही त्यामुळे चाहत्यांनी कॅन्सरला बाजूला सारून हे लक्षात ठेवाव. 

एवढंच काय तर ऋषी कपूर यांनी आपल्या सिनेमातील एक सीन देखील शेअर केला आहे. कारण काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांच्या आईचं म्हणजे कृष्णा राज कपूर यांच निधन झालं. तेव्हा नेमके ऋषी कपूर, नीतू कपूर आणि रणबीर कपूर उपस्थित नव्हते. म्हणून चर्चांना उधाण आलं.