Shah Rukh Khan Aamir Khan and Salman Khan Film: बॉलिवूड अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहेत. 90 च्या दशकात या तिघांनी चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला. परंतु, तिघांनी आतापर्यंत एकत्र काम कधीच केलेले नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानने सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये आमिर खानने सांगितले होते की, 6 महिन्यांपूर्वी त्याची सलमान खान आणि शाहरुख खानसोबत एक चित्रपट करण्याबाबत चर्चा झाली होती. तिघेही योग्य स्क्रिप्टची वाट पाहत आहेत.
रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान म्हणाला, 'जवळपास 6 महिन्यांपूर्वी शाहरुख खान, सलमान खान आणि मी एकत्र होतो आणि आम्ही याबद्दल बोललो. मी स्वत: याची सुरुवात केली आणि शाहरुख-सलमानला सांगितले की, जर आपण तिघांनी एकत्र चित्रपट केला नाही तर खूप वाईट होईल. मला वाटते की सलमान आणि शाहरुखनेही याला सहमती दर्शवली आणि सांगितले की होय. आपण तिघांनी मिळून एक चित्रपट करावा. यासाठी योग्य कथा आवश्यक आहे. त्यामुळे आता योग्य स्क्रिप्टची वाट पहावी लागेल. यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत
तीन खान एकत्र दिसणार
आमिर खानने शाहरुख खान आणि सलमान खानसोबत कम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसला होता. यावेळी त्याने म्हटले होते की, जेव्हा आम्ही एकत्र होतो त्याच वेळी मी सलमान खान आणि शाहरुख खान यांना सांगितले होते की आपण गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत काम करतोय. आपल्याला एकत्र चित्रपट करायाला पाहिजे. जर आपण एकत्र काम करत नसेल तर तो प्रेक्षकांवर अन्याय होईल. एका चित्रपटात आपण तिघांनी एकत्र काम केले पाहिजे असं तो म्हणाला होता.
शाहरुख-सलमानने एकत्र केलेले चित्रपट
आमिर खानने सलमान खानसोबत शेवटचा चित्रपट 'अंदाज अपना अपना' केला होता. तर शाहरुख खान आणि सलमान खानने एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये 'कुछ कुछ होता है', 'हम तुम्हारे हैं सनम', 'ट्यूबलाइट', 'जीरो', 'पठान' आणि 'टाइगर 3' या चित्रपटांचा समावेश आहे. आता सलमान खान आणि शाहरुख खान लवकरच यश राज फिल्मच्या 'टाइगर वर्सेस पठान' या चित्रपटात दिसणार आहेत.