सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाची रिलीज डेट बदलली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या सविस्तर

जगभरात तब्बल 12,500 स्क्रीनवर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट सुरू आहे. अशातच सनी देओलच्या 'जाट' या चित्रपटाचा टीझर 'पुष्पा 2'सोबत रिलीज केला आहे.  

- | Updated: Dec 7, 2024, 03:32 PM IST
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाची रिलीज डेट बदलली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या सविस्तर title=

बॉलिवूड स्टार सनी देओल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. त्याचा आगामी चित्रपट 'जाट' चा टीझर जगभरात रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटासोबत 'जाट'चा टीझर दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'शी टक्कर देणार असल्याचे सुरुवातीला बोलले जात होते, मात्र निर्मात्यांनी टीझरद्वारे या अफवांना पूर्णविराम दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे.  

यापूर्वी सनी देओल 'गदर 2' मध्ये दिसला होता, जो 2023 मध्ये हिंदी सिनेमाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.  सनी देओलसाठी 2023 हे वर्ष खूप चांगले होते. धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि सनी देओलचा 'गदर 2' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सनीचे 'लाहोर 1947' आणि 'बॉर्डर 2' देखील लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉबी नुकताच सूर्या याच्या 'कंगुवा' चित्रपटात दिसला होता. सनी देओल 2025 मध्ये तीन आगामी चित्रपटांसह उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.  

'जाट' या चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. त्याचे चित्रीकरण ऋषी पंजाबी यांनी केले आहे आणि नवीन नूली यांच्या संपादनाखाली चित्रपटाचे संपादन झाले आहे. अ‍ॅक्शन कोरिओग्राफर अनल अरासू, राम लक्ष्मण आणि वेंकट यांच्या तांत्रिक टीमने स्टंट्स आणि अ‍ॅक्शन सीन दिलेत. हा चित्रपट Mythri Movie Makers आणि People Media Factory यांनी निर्माण केला आहे. या अ‍ॅक्शन चित्रपटात रणदीप हुडा, विनीत कुमार सिंग, सैयामी खेर आणि रेजिना कॅसांड्रा महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. हा चित्रपटाची अ‍ॅक्शनप्रमाणेचं कथाही तितकीचं जबरदस्त आहे. हा चित्रपट एप्रिल 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

सनी देओल हा चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'बेताब' हा त्यांचा पहिला चित्रपट होता, ज्यात सनी देओलसोबत अमृता सिंग मुख्य भूमिकेत होती. सनी देओलने 'बॉर्डर', 'गदर', 'घायाळ', 'घातक' असे अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.  

या हिट चित्रपटांनी सनी देओलला कधीच मागे वळून पाहू दिले नाही आणि आज तो एका खास स्थानावर आहे. त्यांचा 'घातक' हा चित्रपट 1996 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, ज्याचे संवाद आजही तितकेच लोकप्रिय आहेत.