नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक

Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक

Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या

May 02, 2023, 12:48 PM IST
Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या  रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या

Apr 14, 2023, 15:27 PM IST
Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...

Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...

Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या

Apr 09, 2023, 19:07 PM IST
Shocking revelations in Nitin Gadkari threat case, Jayesh Pujari Converted

Nitin Gadkari । नितीन गडकरी धमकीप्रकरणी धक्कादायक खुलासे

Shocking revelations in Nitin Gadkari threat case, Jayesh Pujari Converted

Apr 07, 2023, 13:30 PM IST
नितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण

नितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे नरेंद्र महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित करण्यात आले.

Apr 01, 2023, 14:35 PM IST
Mumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Mumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Mumbai - Goa Highway News : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते

Mar 30, 2023, 10:21 AM IST
Nitin Gadkari : पटलं तर मत द्या, नाहीतर... नितीन गडकरी यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?

Nitin Gadkari : पटलं तर मत द्या, नाहीतर... नितीन गडकरी यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?

Nitin Gadkari : नेहमीच आपल्या स्पष्टवक्तपणामुळे चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या वेगळ्याच विधानामुळे चर्चेत आले आहे. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना राजकारणातून निवृत्तीचे

Mar 27, 2023, 10:13 AM IST
Nagpur Nitin Gadkari Threaten Call one Girl arrested

VIDEO | गडकरींच्या कार्यालयात धमकीचा मेल

Nagpur Nitin Gadkari Threaten Call one Girl arrested

Mar 22, 2023, 15:55 PM IST
 Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

 Nitin Gadkari :  नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी मंगळुरुत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात

Mar 22, 2023, 15:52 PM IST
Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत

Mar 21, 2023, 15:22 PM IST
Nitin Gadkari:  प्रवाशी ड्रोनने विमानतळावर जातील; नितीन गडकरी यांचे वक्तव्य

Nitin Gadkari: प्रवाशी ड्रोनने विमानतळावर जातील; नितीन गडकरी यांचे वक्तव्य

शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोचा ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही

Feb 19, 2023, 23:21 PM IST