Nitin Gadkari On Pune Traffic: गेल्या 5 वर्षात पुण्यातील ट्राफिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. अशातच आता पुण्याला (Pune News) नवमार्गांची गरज आहे. अनेक उड्डान पुलांचं काम सुरू असताना आता पुणे सारख्या शहरासाठी आगामी 50 वर्षांचा विचार करून योग्य ती पाऊलं उचलण्याची गरज आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री आणि मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरी यांनी पुणेकरांना आनंदाची बातमी दिली आहे. पुण्यात चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.
माझ्याकडे पुण्यासाठी (Pune News) हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांना एकदा विनंती आहे की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पहावं. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari On Pune Traffic) म्हणाले आहेत. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत, असं नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले आहेत.
पुणे आता अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. मला भारतातुन पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचं आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य असल्याचं देखील गडकरींनी यावेळी म्हटलं आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. पुण्याला पेट्रोल- डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदुषण कमी होईल, असंही गडकरी म्हणाले आहेत. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही. आम्ही आमचं टॉयलेटचे पाणी विकून 300 कोटी रुपये कमावतो. मी पन्नास हजार कोटीत पुण्याचे सर्व उड्डाणपूल बांधून द्यायला तयार आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पुण्यातील खराडी बायपास परिसरात मोठ्या प्रमाणात ट्राफिक दिसून येतं. त्यावेळी गडकरींनी आठ पदरी रस्ता, वर चार पदरी उड्डानपूल अन् त्याच्यावर मेट्रो अशी कल्पना मांडली होती. त्यामुळे पुण्यातील बाहेरील ट्राफिक कमी होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता पुणेकरांना ट्राफिकच्या कोंडीपासून सुटका मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.