नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष

भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.

आणखी बातम्या

...तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित

...तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित

Nitin Gadkari On Petrol Price: गडकरींनी 5600 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनांसंदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच कार्यक्रमांमधील भाषणामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी भविष्यवाणी करताना

Jul 05, 2023, 12:02 PM IST
"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा

Jul 01, 2023, 10:55 AM IST
"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला

"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला

Mumbai - Nagpur Samruddhi Highway : सुरुवातीपासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा अपघातांसाठी चर्चेत आहे. महामार्गाच्या उद्घाटानानंतर या महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे.

Jun 18, 2023, 11:02 AM IST
गडकरींना मिळाली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर; उत्तर देत म्हणाले होते "तुमच्या पक्षात येण्यापेक्षा..."

गडकरींना मिळाली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर; उत्तर देत म्हणाले होते "तुमच्या पक्षात येण्यापेक्षा..."

Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना एकदा काँग्रेस (Congress) नेत्याने पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता

Jun 17, 2023, 14:23 PM IST
मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील

मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील

Sharad Pawar Praise Nitin Gadkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे.

Jun 07, 2023, 09:58 AM IST
 Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS Information about accused Jayesh Pujari in investigation

RSSवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी..आरोपी जयेश पुजारीची चौकशीत माहिती

Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS Information about accused Jayesh Pujari in investigation

May 26, 2023, 21:00 PM IST
'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती

'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही उघड झालं

May 26, 2023, 19:54 PM IST
आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन

आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन

Nitin Gadkari Death Threat: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात

May 16, 2023, 16:38 PM IST