मध्य प्रदेशात इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली आणखी काही जण दाबले गेले असण्याची शक्यता आहे.
थोडी खुशी, ज्यादा गम अशा नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात
आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होतेय. वस्तू आणि सेवा कराच्या रूपात गेल्या वित्त वर्षांत अप्रत्यक्ष कर सुधारणेचा पहिला टप्पा राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा नव्या आर्थिक वर्षांत सुरू होणार आहे. मात्र नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात महागाई वाढीला निमंत्रण ठरणारी आहे.
लातूरच्या विकासाचा पॅटर्न तयार करणार- मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे बोगी आणि देशातील पहिल्या मेट्रो कोच कारखान्याचे भूमिपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. लातूर शहराजवळील हरंगुळ इथं हा कारखान तयार होतो आहे. लातूरचा रेल्वे डब्ब्यांचा कारखाना हा सर्वात कमी कालावधीत तयार होणार कारखाना असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
वांद्रे-वरळी सी-लिंकवरील प्रवास आजपासून महागला
मुंबई वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
स्मिथच्या रडण्यावर बोलला आर अश्विन
टीम इंडियाचा स्टार स्पिनर आर. अश्विनने बॉल टँपरिंग प्रकरणात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरचं समर्थन केलं आहे. त्याने म्हटलं की, जग फक्त तुम्हाला रडवतो. एकदा का तुम्ही रडले तर ते संतुष्ट होऊन जातात आणि त्यानंतर आनंदी राहतात.
वार्नरच्या जागी हैदराबाद टीममध्ये या खेळाडुला मिळाली संधी
इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मधील टीम सनरायजर्स हैदराबादने आगामी आयपीएल सिजनसाठी डेविड वॉर्नरच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे. इंग्लंडचा ओपनर एलेक्स हेल्स आता डेविड वॉर्नरच्या जागी खेळणार आहे. हेल्सला त्याची बेस प्राईज 1 कोटींना रजिस्टर्ड अँड अवेलबल प्लेयर्स पूल (आरएपीपी) लिस्ट मधून खरेदी केलं आहे.
सावधान! रस्त्यावर लिंबूपाणी पिणे पडू शकतं महाग
सरबतमध्ये वापरण्यात आलेले पाणी खरंच चांगल्या दर्जाचे आहे का...?
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरला गुगलची आदरांजली
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांची आज 153 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आनंदीबाई जोशी यांना आदरांजली वाहिली आहे. डुडलच्या माध्यमातून आनंदीबाई जोशी यांना सलाम करण्यात आला आहे.
१ एप्रिलपासून सीएसएमटी-गोरेगाव हार्बर सेवा होणार सुरु
येत्या १ एप्रिलपासून सीएसएमटी ते गोरेगाव अशी हार्बर सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या मार्गाचं उद्घाटन गुरुवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात ४२ सेवा चालवण्यात येणार आहेत.
शेतक-याला हमालाकडून मारहाण, संतप्त शेतकऱ्यांकडून लिलाव बंद
बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडले.