इंदूर : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली आणखी काही जण दाबले गेले असण्याची शक्यता आहे.
इंदूरमधील सरवटे बस स्थानक परिसरात एमएस हॉटेलची चार मजली इमारत होती. एक कार इमारतीवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येतं आहे. आतापर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हॉटेल मॅनेजर हरीश याचे 70 वर्षीय वडील गणेश सोनी यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
Early morning visuals from #Indore building collapse site, the incident has claimed 10 lives. #MadhyaPradesh pic.twitter.com/rFOLYGMADO
— ANI (@ANI) April 1, 2018
कोसळललेली इमारत 50 वर्षांपेक्षा जुनी असल्याचे सांगण्यात येतं आहे. ही इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली होती का याचाही तपास आता जिल्हा प्रशासन करतं आहे. मात्र 10 निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.