१ एप्रिलपासून सेवांचा लाभ घेण्यासाठी द्यावा लागणार अतिरिक्त अधिभार
रविवारपासून म्हणजेच एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होतं आहे
नांदेडमध्ये उपचाराअभावी बाळाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा ढिम्मच
उपचाराअभावी एका आदिवासी महिलेच्या दहा दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिम्मच आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींच्या अडचणींना पारावार उरलेला नाही. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातल्या मोहपूर या दुर्गम भागातल्या गावात आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य पथकही आहे. पण या दोन्ही ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नसतो. त्यामुळेच उपकेंद्रात दोन दिवस येऊनही तिथे कोणीच नसल्यानं, उपचारांअभावी सागर कुरुडे या महिलेच्या अवघ्या दहा दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला.
चीनचं तियांगोंग -1 हे स्पेस स्टेशन भारतावर कोसळण्याची शक्यता
चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.
निधीवाटपाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात जुंपण्याची शक्यता आहे.
विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार
विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताना याबाबत औपचारिक घोषणा करण्यात येईल.
१ मे पासून शाळेला सुट्टीचा निर्णय सरकारने घेतला मागे
विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधा-यांना आपला निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली आहे.
शिवप्रतिष्ठनच्या धारकऱ्यांचा 65 किलोमीटर अनवानी पायाने प्रवास
सांगलीतील भिडे गुरुजी सन्मान महामोर्चासाठी बत्तीस शिराळा येथून 65 किलोमीटर पायी चालत शिवप्रतिष्ठानचे धारकरी आले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात भरगच्च कामकाज ठेवण्यात आले आहे. असं असलं तरी अधिवेशनाची समाप्ती होतांना पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होण्याबाबत काय घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
संभाजी भिडेंच्या समर्थनात राज्यभरात शिवप्रतिष्ठानचा मोर्चा
शिवप्रतिष्ठानाच्या वतीनं सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राज्याच्या विविध शहरात मोर्चे काढत आहेत.
सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.