थोडी खुशी, ज्यादा गम अशा नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात

आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होतेय. वस्तू आणि सेवा कराच्या रूपात गेल्या वित्त वर्षांत अप्रत्यक्ष कर सुधारणेचा पहिला टप्पा राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा नव्या आर्थिक वर्षांत सुरू होणार आहे. मात्र नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात महागाई वाढीला निमंत्रण ठरणारी आहे.

shailesh musale Updated: Apr 1, 2018, 11:00 AM IST
थोडी खुशी, ज्यादा गम अशा नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात title=

मुंबई : आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होतेय. वस्तू आणि सेवा कराच्या रूपात गेल्या वित्त वर्षांत अप्रत्यक्ष कर सुधारणेचा पहिला टप्पा राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा नव्या आर्थिक वर्षांत सुरू होणार आहे. मात्र नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात महागाई वाढीला निमंत्रण ठरणारी आहे.

थोडी खुशी, ज्यादा गम

मात्र हे नवीन वर्ष थोडी खुशी, ज्यादा गम असंच असणार आहे. आयकराच्या नव्या नियमांमुळे वस्तू आणि सेवा महागणार आहेत. देशभरातील प्रवासही महाग होणार आहे. दुसरीकडे रेडी रेकनरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या अतिरिक्त एक टक्के अधिभारामुळे ग्राहकांना विविध सेवांचा लाभ अधिक पैसे देऊन घ्यावा लागणार आहे. अधिभाराचे प्रमाण एक टक्क्याने वाढवत ते आता 4 टक्के करण्यात आलंय. भांडवली बाजारातील समभाग विक्रीवर होणा-या एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या लाभावर 10 टक्के कर लावण्यात येणार आहे. 

14 वर्षांनंतर असा कर

तब्बल 14 वर्षांनंतर असा कर पुन्हा प्रत्यक्षात आल्याने भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेतील तसेच पोस्टातील ठेवींवर सवलत लागू होणार आहे. शिवाय लघुउद्योगांसाठी कमी कंपनी कर लागणार आहे.