वार्नरच्या जागी हैदराबाद टीममध्ये या खेळाडुला मिळाली संधी

इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मधील टीम सनरायजर्स हैदराबादने आगामी आयपीएल सिजनसाठी डेविड वॉर्नरच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे. इंग्लंडचा ओपनर एलेक्स हेल्स आता डेविड वॉर्नरच्या जागी खेळणार आहे. हेल्सला त्याची बेस प्राईज 1 कोटींना रजिस्टर्ड अँड अवेलबल प्लेयर्स पूल (आरएपीपी) लिस्ट मधून खरेदी केलं आहे.

shailesh musale Updated: Mar 31, 2018, 03:58 PM IST
वार्नरच्या जागी हैदराबाद टीममध्ये या खेळाडुला मिळाली संधी title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मधील टीम सनरायजर्स हैदराबादने आगामी आयपीएल सिजनसाठी डेविड वॉर्नरच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे. इंग्लंडचा ओपनर एलेक्स हेल्स आता डेविड वॉर्नरच्या जागी खेळणार आहे. हेल्सला त्याची बेस प्राईज 1 कोटींना रजिस्टर्ड अँड अवेलबल प्लेयर्स पूल (आरएपीपी) लिस्ट मधून खरेदी केलं आहे.

कोणाला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)ने शनिवार या बाबत माहिती दिली. हैदराबादमध्ये आता वार्नर च्या जागी हेल्सची निवड करण्यात आली आहे. हेल्स 2015 च्या एडिशनमध्ये मुंबई इंडियंसकडून खेळत होता. पण त्याला कोणताच सामना खेळण्याची संधी नाही मिळाली. आता वॉर्नरवर बॉल टेंपरिंगच्या प्रकरणात बंदी घातल्याने त्याच्या जागी नवा खेळाडू हैदराबादने आपल्या संघात घेतला आहे. 

Image result for alex hales zee

१ वर्षाची बंदी

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर १ वर्षाची बंदी घातल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने देखील आयपीएलमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हेल्स धवनसोबत ओपनिंगला येऊ शकतो. हेल्स इंग्लंडकडून टी20 इंटरनेशनलमध्ये शतक ठोकणारा एकमेव खेळाडू आहे. सनरायजर्सचा पहिला सामना ९ एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.