भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात
पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ५ राज्य़ांच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. अमित शहा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात चाणक्य ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी नेतृत्व दिलं आणि या नेतृत्वाला ग्राऊंड लेवलवर यशस्वी अमित शहा यांनी केलं. त्यामुळे भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल.
हॉलिवूड स्टार विन डीजल प्रमोशनसाठी मुंबईत, झालं जोरदार स्वागत
हॉलिवूड स्टार विन डीजल त्याच्या आगामी 'xXx : रिटर्न ऑफ जैंडर केज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. गुरुवारी सकाळी एयरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत झालं.
शेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था
राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.
शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात आजपासून बोलणी
१० महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज संध्याकाळी जाहीर होणार
Yahoo चं नाव बदलणार
Yahoo ची कॉरपोरेट आइडेंटिटी आता बदलणार आहे. कंपनीने याहू हे नाव बदलून नवं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनीचं नाव Altaba Inc होणार आहे.
फुटबॉलपटू रोनाल्डोला फिफा प्लेअर ऑफ इयर पुरस्कार
सुप्रसिद्ध फुलबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदा पुन्हा एकदा फिफा प्लेअर ऑफ इयरचा पुरस्कार देण्यात आलाय. रोनाल्डोनं त्याचा प्रतिस्पर्धी लिओनन मेसीला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. 31 वर्षीय रोनाल्डोला याआधीही तीन वेळा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
खूशखबर! मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार इतके पैसे
केंद्र सरकार देशवासियांना एक खूशखबरी देऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम सरकारकडून जमा केली जाऊ शकते.
लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री
पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
समान नागरी कायदा लागू करण्याची विश्व हिंदु परिषदेची मागणी
वाढत्या कट्टरतावादावर मियंत्रण मिळवण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेनं केली आहे. नागपुरात संपन्न जालेल्या 3 दिवसीय बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव पास करण्यात आला. ही मागणी फक्त आपणच केली नसून देशातील न्याय पालिकेने देखील या संबंधाने निवाडा दिल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री सुरेंद्र जैन यांनी नागपुरात आयोजित एक पत्रकार परिषदेत सांगितले.
आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोधला अफलातून उपाय
आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोझधला अफलातून उपाय