नाशिक : राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.
नाशिक त्र्यंबक रस्त्यावर असलेली ही आधारतीर्थ संस्था. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना आधार देणारी संस्था असे नाव. संस्थेत साडेतीनशे मुलं रहात असल्याचा दावा. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. या वसतीगृहात राहणाऱ्या 80 टक्के मुलांच्या आईवडीलानी आत्महत्या केलेलीच नाही. इतकच नाही तर काही मुलांचे पालक शेतकरीही नाहीत. या मुलांना खोटे बोलण्यास भाग पाडून यांचे प्रदर्शन मांडलं जात असल्याचा आरोप संस्थेत नसलेल्या एका मुलानं केला आहे.
झी २४ तासने या संस्थेला भेट दिली तेव्हा संस्थेनं केवळ 65 मुलं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असल्याचं संस्थेनं कबुल केलं आहे. शिवाय शेजारच्या शासकीय बालगृहात विद्यार्थी नसल्यानं अशा तक्रारी वारंवार केल्या जात असल्यांचा आरोप संस्थेच्या अध्यक्षांनी केला आहे. विषय मुलांचा आणि गरीब पालकांचा आहे. मात्र त्यासाठी संस्थेला खोटेपणानं वागण्याची गरजच नाही. त्यामुळे अशा संस्थांना मदत करताना जनतेनंही डोळसपणे मदत करायला हवी.
पाहा व्हिडिओ