नवी दिल्ली : केंद्र सरकार देशवासियांना एक खूशखबरी देऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम सरकारकडून जमा केली जाऊ शकते.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक सर्वे आणि बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते. असंही म्हटलं जात आहे की, सगळ्या नाही पण सरकार अशा लोकांसाठी ही योजना लागू करु शकते ज्यांच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे. अशा लोकांच्या खात्यात 500 रुपये जमा करुन या योजनेती सुरुवात होऊ शकते.
देशातील जवळपास 20 कोटी गरजूंना याचा फायदा होऊ शकतो. हा प्रस्ताव लंडन यूनिवर्सिटीचे प्रोफेसर गाय स्टँडिंग यांनी तयार केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, मोदी सरकारमधील एका व्यक्तींने सांगितलं आहे की, आगामी बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते.
प्रोफेसर गायने संकेत दिले आहेत की, सरकारने मध्य प्रदेशातील एका पंचायतीत पायलट प्रॉजेक्ट म्हणून या स्कीमवर काम केलं आहे. जेथे साकारत्मक गोष्टी समोर आल्या, मी माझ्या प्रपोजलमध्ये श्रीमंत-गरीब सगळ्यांसाठी एका उत्पनाची गोष्ट मांडली आहे. प्रोफेयर गाय संपूर्ण जगात यूनिवर्सल बेसिक इनकमवर काम करत आहेत.