संपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट

संपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट

आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.

महागड्या गाडीतून विधानभवनात आलेल्या आमदाराने पत्रकारांना पाहून घेतला यूटर्न

महागड्या गाडीतून विधानभवनात आलेल्या आमदाराने पत्रकारांना पाहून घेतला यूटर्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नेत्यांना साधं राहणीमान ठेवण्यास सांगतात. पण महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सगळ्यांना तेव्हा हैराण केलं जेव्हा ते त्यांची अलीशान लँबोर्गिनी कार घेऊन विधानसभेत पोहोचले. या कारची किंमत जवळपास ५.५ कोटी आहे. नारंगी रंगांची ही लँबोर्गिनी घेऊन जेव्हा आमदार मेहता हे विधानसभेत पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार मेहता यांनी पत्रकारांना पाहून यूटर्न घेतला आणि विधानसभेत जाण्याऐवजी तेथून निघून गेले.

टॉप 10 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान नाही

टॉप 10 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान नाही

केंद्र सरकारनं जारी केलेल्या देशातल्या दहा प्रमुख विद्यापाठींच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही.

मुंबईत बांधकामाला मंजुरीसाठी आता पालिकेत खेटे घालण्याचा त्रास वाचणार

मुंबईत बांधकामाला मंजुरीसाठी आता पालिकेत खेटे घालण्याचा त्रास वाचणार

मुंबईत बांधकामाला मंजुरी देण्याचे अधिकार आता परवानाधारक खाजगी वास्तुविशारदांना आणि सर्वेक्षकांना मिळणार आहेत. 

ड्रायविंग लायसेंसबाबत महत्त्वाची बातमी

ड्रायविंग लायसेंसबाबत महत्त्वाची बातमी

देशात ३० टक्के ड्रायविंग लायसेंस हे बनावट 

सायना आणि सिंधू क्वार्टर फायनलमध्ये आमने-सामने

सायना आणि सिंधू क्वार्टर फायनलमध्ये आमने-सामने

भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी टूर्नामेंटमध्ये सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. तर सिंधुने जपानच्या सेइना कावाकामीचा पराभव करत आपली जागा पक्की केली.

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली

योगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.

जिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

जिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.