How To Buy High Heels : आजकल अनेक मुलींना हाय हिल्स घालायला खूप आवडतात. ट्रेडिंग फॅशन म्हणून असो किंवा व्यक्तिमत्त्व वाढवण्यापर्यंत, हाय हील्स प्रत्येक गोष्टीत चांगली भूमिका बजावतात. मात्र अनेकवेळा मुलींना आवड असूनही हाय हिल्स सांभाळायला होत नाही. त्यामुळे आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यांना फॉलो केल्यास तुम्ही सहजपणे हाय हिल्स घालू शकता.
हिल्सच्या साइजकडे द्या लक्ष
हिल्सच्या साइजकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. कधीही फॅशन म्हणून उंच टाचांची हिल्स खरेदी करू नका, कारण असे करून तुम्ही साइज आणि
तुम्हाला मिळणाऱ्या आरामाकडे दुर्लक्ष करता. त्यामुळे जेव्हाही तुम्ही उंच टाचांच्या हिल्स खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा ट्राय करून बघा आणि साइज नीट तपासा. ते आरामदायक आहेत की नाही हे देखील पहा.
हळूहळू उंच टाचांची सवय लावा
तुम्ही जर कधी हिल्स वापरली नसेल तर हळूहळू हिल्सची उंची वाढवा, कारण सवय नसल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू हाय हिल्स घालण्याची सवय लावा. सगळ्यात आधी घरी परिधान करून चालण्याचा सराव करा. यानंतरच हाय हिल्स घालून बाहेर जा.
ब्लॉक हील्सपासून करा सुरुवात
थेट उंच टाचांती हिल्स घालणे तुमच्यासाठी खूप धोकादायक असू शकते. त्यामुळे सगळ्यात आधी ब्लॉक हिल्स असलेली हिल्स घालण्याची सवय लावून घ्या. हाय हिल्स घालताना, हे देखील लक्षात ठेवा की तुमचा जोर अंगठ्याऐवजी टाचांवर असावा.
हेही वाचा : लहान मुलांना देताय फोन, त्यांच्या IQ वर होऊ शकतो गंभीर परिणाम
हिल्स घालायची एकदा सवय झाली की तेव्हाच तुम्ही बाहेर पडा. हिल्स खरेदी केल्या केल्या ती बाहेर वापरायला काढू नका जर तुम्ही कधी वापरली नसेल तर त्यामुळे सुरुवात ही 2-3 इंच च्या हाय हिल्सनि सुरुवात करा. पेन्सिल हिल्स किंवा 4-5 इंची हिल्स घालायची इच्छा असेल तर त्यासाठी आधी साधारण हिल्सवर चालण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला सवय झाली की काही चिंता करण्याची आवश्यकता नाही.
हाय हिल्स न घालण्याची कारणे
भारतात बहुतेक मुलींना हाय हिल्स घालण्याची सवय नसते. पण काही खास प्रसंगी त्या नक्कीच हाय हिल्स घालण्यास प्राधान्य देतात. यामुळे अनेकवेळा त्यांचा पायाला ताण पडतो आणि वेदना सुरू होतात. त्यामुळे मुलींना चालताना अस्वस्थता वाटते म्हणूनच कोणत्याही खास प्रसंगी हील्स घालण्यापूर्वी त्याआधी अनेकदा वापरून चांगली सवय करून घेणे आवश्यक आहे.