Virtual autism : आजकाल सगळीच मुलं ही लहाणपणापासून फोन वापरताना दिसतात. त्याचं कारण म्हणजे एकतर आई-वडील त्यांच्या रडण्याला किंवा सतत करत असलेल्या मस्तीला कंटाळून त्यांना मोबाईल फोन देतात. हे आजकाल खूपच साधारण आहे. कारण मुलं लगेच शांत होतात. जगभरात करण्यात आलेल्या अनेक रिसर्च्स प्रमाणे ही गोष्ट समोर आली आहे की मुलांना असाच फोन दिल्यानं त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. इतकंच नाही तर आणखी एक रिपोर्टनुसार ही गोष्ट समोर आली आहे की त्या मुलांच भविष्य देखील खराब होतं. व्हर्चुअल ऑटिजम होण्याची शक्यता वाढते.
व्हर्चुअल ऑटिजमची लक्षण ही साधारणपणे चार ते पाच वर्षाच्या मुलांमध्ये दिसून येत. मोबाईल फोन, टीव्ही आणि कॉम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या सतत वारण्याच्या सुरुवातीमुळे हे अनेकदा होते. स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर, लॅपटॉप आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांना समाजातील इतर लोकांशी बोलण्यात आणि संवाद साधण्यात अडचण येऊ लागतात.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, बिहार आणि देशभरातील मुलांमध्ये व्हर्चुअल ऑटिझमच्या प्रकरणांमध्ये गेल्या एका दशकात तीन ते चार पट वाढ झाली आहे. यामागे अनुवंशिक हा महत्त्वाचा घटक करत असतो. जर आई-वडील मोबाईलचा जर खूप वापर करत असतील तर त्याचा त्यांच्या मुलांवर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांमध्ये आई-वडील हे मुलांना गोष्टी सांगत नाही तर ते मुलांना गॅजेट्स देतात. त्यामुळे कुटुंबाचासुद्धा एकमेकांशी कमी संवाद होतो.
हेही वाचा : Paresh Rawal यांना आलाय 'बाबु भैय्या'चा कंटाळा?
दरम्यान, ज्या मुलांमध्ये व्हर्चुअल ऑटिजमची लक्षणं दिसतात ते खूप उशिरा बोलू लागतात किंवा ते कोणाशी बोलण्यास देखील घाबरतात. तर असे अनेक मुलं असतात जे कोणाकडे बघूण बोलण्यास घाबरतात. त्यांना लोकांसोबत एका ग्रुपमध्ये रहायला देखील भीती वाटते किंवा ते पसंत करत नाहीत. त्यांच्यानं मुलांचा आयक्यू देखील कमी राहतो. त्यामुळे वयाच्या 5 वर्षांपर्यंत मुलांच्या हातात फोन देऊ नका. मुलांना जास्तवेळा लोकांमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना इतर गोष्टींमधून वेगवेगळ्या गोष्टी शिकवा. त्यांना अभ्यास शिकवण्यासाठी काही सोप्या आणि मजेशीर गोष्टी निवडा. इतकंच काय तर मुलांना खेळायला घेऊन जा. निसर्गात त्यांना वेळ व्यथित करायला भाग पाडा. त्यांचा एक स्क्रिन टाईम ठरवा. त्यानंतर त्यांना इतरांशी बोलण्यासाठी प्रोत्साहन करा. असं केल्यानं नक्कीच तुमची मुलं फोन वापरणार नाहीत.