coronavirus : अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनाने १५००हून अधिकांचा मृत्यू

संपूर्ण जगच कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे

Updated: Apr 14, 2020, 09:52 AM IST
coronavirus : अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनाने १५००हून अधिकांचा मृत्यू title=
फोटो सौजन्य : Reuters

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात स्थिती गंभीर आहे. संपूर्ण जगच या कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. अमेरिकेसाखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासांत 1509 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 हजारवर गेली आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक 5 लाख 81 हजार लोक कोरोनाबाधित आहेत.

न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजारवर गेली आहे. 

अमेरिकेनंतर इटली सर्वाधिक कोरोनाबाधित असलेला देश आहे. इटलीत 1 लाक 59 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे इटलीत 20 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्येही कोरोनाचं तांडव सुरुच आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा 15 हजारच्या जवळपास पोहचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1 लाख 37 हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत 28 हजारहून अधिक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढत असूनही स्पेनमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 17 हजार 500 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 70 हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 9 हजार 352वर गेली आहे. तर भारतात आतापर्यंत 980 रुग्णबरे झाले आहेत. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 342 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात 400 जिल्हे कोरोना प्रभावित आहेत. 

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोच आहे. मात्र भारतात एक दिलासादायक बाब म्हणजे 15 राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.