वॉशिंग्टन : जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ लाख २ हजार १७ जण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत. कोरोनाचं प्रमुख केंद्र असलेल्या चीनमधल्या वुहान शहरातून लॉकडाऊन उठविण्यात आले आहे. ७६ दिवसांनंतर पहिल्यांदाच वुहान शहराच्या सीमा झाल्या खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये गेल्या २४ तासांत ७३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असून, याठिकाणी कोरोनाग्रस्तांच्या मृत्युमुखींची संख्या अधिक आहे. यामुळे, न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ५ हजार ४०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
China lifts 76-day COVID-19 lockdown in Wuhan
Read @ANI Story | https://t.co/LsPh9wtLUI pic.twitter.com/U1yq0abrLJ— ANI Digital (@ani_digital) April 7, 2020
जगभरातील करोनाच्या साथीचे प्रमुख केंद्र ठरलेले आणि गेल्या २३ जानेवारीपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेलं चीनमधील वुहान शहराने आज मोकळा श्वास घेतला. करोनाशी लढाई लढणाऱ्या चीनमध्ये सोमवारी एकही नवीन करोना मृत्यू झाला नाही. त्यामुळे गेल्या ७६ दिवसांनंतर पहिल्यांदाच वुहान शहराच्या सीमा खुल्या करण्याचे चीन सरकारने ठरवले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ७० हजाराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार लोक युरोपिय देशातले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ हजार ८७७ जणांचा मृत्यू या विषाणूच्या बाधेमुळे झाला असून स्पेनमध्ये या विषाणूच्या संसर्गामुळे १३ हजार ५०५ लोक मृत्युमुखी पडले आहेत.