भारताजवळ 7556 किमी अंतरावर सापडले जमिनीत गाडलेले 'टाइम मशीन'; पृथ्वीची अनेक रहस्य उलगडणार

या नवीन शोधामुळे पृथ्वीचा जुना हवामान इतिहास उघड होऊ शकतो. 12 युरोपियन संस्थांमधील तज्ञांनी 200 पेक्षा जास्त दिवस एकत्र काम करुन हे टाईम मशिन शोधले आहे.  

वनिता कांबळे | Updated: Jan 12, 2025, 05:35 PM IST
 भारताजवळ 7556 किमी अंतरावर सापडले जमिनीत गाडलेले 'टाइम मशीन'; पृथ्वीची अनेक रहस्य उलगडणार title=

Old ice Found: भारताजवळ 7556 किमी अंतरावर जिनीत गाडला गेलेला एक बर्फाचा तुकडा सापडला आहे. हा बर्फाचा तुकडा 1.2 दशलक्ष वर्ष जुना आहे. यामुळे मानवाच्या उत्क्रांतीची अनेक रहस्ये उलगडणार आहेत. संशोधकांनी या बर्फाच्या तुकड्याला टाईम मशीन असे नाव दिले आहे.

भारतापासून साडेसात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंटार्क्टिकाच्या बर्फाळ जमिनीखाली हा बर्फाचा तुकडा सापडला आहे. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एका आंतरराष्ट्रीय टीमने -35 अंश सेल्सिअस तापमानात 2.8 किमी खोल बर्फातून हा नमुना बाहेर काढला आहे. 'बियॉन्ड एपिका' प्रकल्पा अंतर्गत हे संशोधन करण्यात आले. या प्रकल्पासाठी लागणारा निधी युरोपियन युनियनने पुरवला आहे. 

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांच्या एका टीमने 9,186 फूट लांब बर्फाचा भाग बाहेर काढला आहे. हा बर्फाचा तुकडा पृथ्वीची अनेक रहस्य उलगडणार आहे. या बर्फाच्या तुकड्यात लाखो वर्षे जुन्या वातावरणाचे बुडबुडे अडकले आहेत. या बुडबुड्यांच्या मदतीने त्यावेळच्या वातावरणातील स्थितीची अचूक अंदाज लावण्यास मदत होणार आहे. हे संशोधन  पृथ्वीवरील हवामान बदल समजून घेण्यासाठी अमूल्य डेटा उपलब्ध करुन देणार आहे. या बर्फाचे 1 मीटरचे छोटे तुकडे करण्यात आले आहेत जेणेकरून त्याचा खोलवर अभ्यास करता येईल. 

या बर्फात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारख्या हरितगृह वायूंची माहिती दडलेली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.  याचे विश्लेषण करुन सूर्यप्रकाश, ज्वालामुखीय क्रियाकलाप आणि पृथ्वीच्या कक्षीय स्थितीतील बदल यासारखे घटक हवामानावर कसा परिणाम करतात याची रहस्य उलगडण्या, मदत करणार आहे. 

या संशोधनामुळे पृथ्वीवरील हिमयुगाचे स्वरूप अचानक कसे बदलले आणि त्याचा मानवी प्रजातींवरही नेमका काय परिणाम झाला, याचा तपशील मिळणार आहे. जवळपास 1 दशलक्ष वर्षांपूर्वी, पृथ्वीवरील हिमयुग चक्रात बदल झाला. ज्याने आदिम मानवी प्रजातींच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते. या बर्फाच्या कोरचा अभ्यास केल्याने पृथ्वीच्या पर्यावरणाने त्या वेळी कसा प्रतिसाद दिला आणि जीव कसे टिकले हे समजण्यास मदत होईल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.