ZP Election 2021 | नागपूरात कॉंग्रेसने गड राखला; राष्ट्रवादीला फटका

नागपूरात कॉंग्रेसने पुन्हा मोठा विजय मिळवला आहे. 

Updated: Oct 6, 2021, 02:16 PM IST
ZP Election 2021 | नागपूरात कॉंग्रेसने गड राखला; राष्ट्रवादीला फटका title=

अमर काणे, नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी 16 जागा जिल्हापरिषदेच्या तर पंचायत समितींच्या 31 जागावर मतमोजणी सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंतच्या निकालाचे कल निकाल स्पष्ट करीत आहेत. पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसने मोठे यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनुक्रमे 2-1 जागा कमी झाल्या आहेत.

नागपूरात कॉंग्रेसने पुन्हा मोठा विजय मिळवला आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. ती कायम ठेवण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. 

नागपूर कॉंग्रेसची  मुसंडी 

  • सुनील केदार यांचा झंझावाती प्रचारामुळे काँग्रेसला 2 जागांचा फायदा झाला आहे. आधीच एकहाती सत्ता असलेल्या कॉंग्रेसने आपला गड आणखी मजबूत केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख प्रचारात नसल्याने  राष्ट्रवादीला  फटका बसल्याचे दिसून आले आहे. 
  • गुमथळा जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अनिल निधान पराभूत झाले आहेत.
  • आशिष देशमुख यांनी  प्रचार केलेले भाजपचे  दोन (एकूण 3) उमेदवार विजयी 
  • गोंडवाना गणतंत्र पार्टी एका जागेवर विजयी

-------------------------------
नागपूर -जिल्हा परिषद-58 जागा

रद्द झालेले जिल्हा परिषद सदस्यत्व 16

काँग्रेस - 7
राष्ट्रवादी - 4
भाजप - 4
शेकाप -1
-----

आधीचे पक्षीय बलाबल - 
काँग्रेस -- 31 
राष्ट्रवादी -- 10
भाजप -- 15
शेकाप -- 1
सेना - 1

निवडणुकीनंतर नवे समीकरण - 

जिल्हा परिषद एकूण जागा - 58 
काँग्रेस -33 (2 फायदा)- आता 9 जागांवर विजयी

राष्ट्रवादी 8 (2 नुकसान)-आता 2  जागांवर विजयी

भाजप - 14 (1 नुकसान)-आता 3 जागांवर विजयी

शेकाप - 1 -(आता  1 जागेवर विजयी)
सेना - 1 -(आता  कुठेच जिंकले नाही)
गोगप - 1- (1 फायदा)-आता एका जागेवर विजयी