रोजचं बोरिंग WhatsApp चॅटिंग मजेदार करायचय? मग या Tricks वापरा आणि मित्रांना Impress करा

तुम्हाला हे माहित आहे का? की व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही, बोल्ड, इट्यालिक आणि स्ट्राइक इत्यादी करु शकतात.

Updated: Aug 12, 2021, 08:16 PM IST
रोजचं बोरिंग WhatsApp चॅटिंग मजेदार करायचय? मग या Tricks वापरा आणि मित्रांना Impress करा title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. त्याची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी, कंपनी यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स बाजारात आणत असते. जेणेकरून यूजर्सच्या चॅटिंगचा अनुभव चांगला होऊ शकेल. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या अस्तित्वात असलेल्या सेवांमध्ये, काही असे वैशिष्ट्ये आहेत ज्याची माहिती आपल्याला नसते परंतु ते खरोखरच खूप उपयुक्त असतात.

तुम्हाला हे माहित आहे का? की व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही, बोल्ड, इट्यालिक आणि स्ट्राइक इत्यादी करु शकतात. एवढेच नाही तर यूझर्स व्हॉट्सअ‍ॅपवर मोनोस्पेस (Monospaced font) केलेले संदेश पाठवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे सर्व व्हॉट्सअ‍ॅपवर कसे केले जाते.

व्हॉट्सअ‍ॅपवर बोल्ड मेसेज कसा लिहायचा: जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कुणाला बोल्ड अक्षरात काही टाईप करायचे असेल, तर तुम्हाला जे काही लिहायचे आहे, त्यामागे तुम्हाला एस्ट्रिक्स म्हणजेच '*' हे चिन्ह लावावे लागेल. म्हणजे जर तुम्हाला कोणाला लिहायचे आहे की, How Are You? तर तुम्हाला *How Are You?* हे असे लिहून पाठवावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर इटॅलिक मेसेज कसा लिहायचा : जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर इटॅलिक स्टाईलमध्ये कोणाला मेसेज करायचा असेल, तर त्यांना मेसेज लिहिताना अंडरस्कोर म्हणजेच '_'  हे चिन्ह लावावा लागेल. उदाहरणार्थ : जर तुम्हाला कोणाला विचारायचे आहे की How Are You? तर तुम्हाला _How Are You?_ असे लिहून पाठवावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर स्ट्राईकथ्रू मेसेज कसा लिहायचा: जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर स्ट्राईकआउट स्टाईलमध्ये कोणाला मेसेज करायचा असेल, तर त्यांना मेसेज लिहिताना टिल्ज म्हणजे '~' हे चिन्ह लावावा लागेल. उदाहरणार्थ : जर तुम्हाला कोणाला विचारायचे आहे की How Are You? तर तुम्हाला असेल, तर तुम्हाला ~How Are You?~असे लिहून पाठवावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर मोनोस्केप (Monospace)मेसेज कसा लिहायचा : जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर मोनोस्केप स्टाईलमध्ये कोणाला मेसेज करायचा असेल, तर त्यांना मेसेज लिहिताना तिन बँक टीक म्हणजेच '``` ' हे चिन्ह लावावा लागेल. उदाहरणार्थ : जर तुम्हाला कोणाला विचारायचे आहे की How Are You? तर तुम्हाला असेल, तर तुम्हाला ```How Are You?``` असे लिहून पाठवावे लागेल.