सावधान ! या लिंकवर कधीच क्लिक करु नका... नाहीतर तुमचे अकाउंट होऊ शकते खाली

हल्लेखोर Ngrok प्लॅटफॉर्मद्वारे फिशिंग वेबसाइट होस्ट करतात.

Updated: Aug 12, 2021, 08:05 PM IST
सावधान ! या लिंकवर कधीच क्लिक करु नका... नाहीतर तुमचे अकाउंट होऊ शकते खाली  title=

मुंबई : इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने हॅकर्सच्या नवीन सायबर हल्ल्याबाबत चेतावणी जारी केली आहे. या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंगला टार्गेच केले जात आहे. याबद्दल, CERT-IN ने सांगितले आहे की, हल्लेखोर Ngrok प्लॅटफॉर्म वापरून लोकांना टार्गेट करत आहेत.

हल्लेखोर Ngrok प्लॅटफॉर्मद्वारे फिशिंग वेबसाइट होस्ट करतात. फिशिंग वेबसाइट भारतातील लोकप्रिय बँकांसारखी दिसते. यामुळे लोकांना या साईट्स खऱ्या असल्यासारख्या वाटतात ज्यामुळे लोकं या हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात.

अशा वेबसाईटवरुन ग्राहकांना संदेश पाठवला जातो, यामध्ये ते लिहितात की, 'प्रिय ग्राहक, तुमचे बँक खाते निलंबित केले जाईल. यासाठी तुमचे KYC  वेरिफिकेशन पुन्हा अपडेट करा. हे अपडेट करण्यासाठी
http://446bdf227fc4.ngrok.io/xxxbank वर क्लिक करा.'

ग्राहकांना हे असे मेसेजेस खरे वाटतात आणि ते अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करतात. ज्यामुळे त्यांचे ऑनलाइन बँकिंग तपशील आणि
मोबाईल क्रमांक या हॅकर्सकडे जातो. ज्याचा वापर करून ते तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

यासाठी ते स्कॅमर ओटोपी तयार करतात. जेव्हा आपण अशा बनावट साइटवर तपशील प्रविष्ट करता, तेव्हा आपल्याला आपल्या फोनवर आलेला ओटोपी या हॅकर्सला मिळेल. कारण आपण त्यांच्या साइटवर क्लिक केल्यामुळे त्यांच्याकडे आपल्या फोनचा संपूर्ण अॅक्सेस जाण्याची देखील शक्यता आहे.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही लिंक्सबद्दल सांगणार आहोत ज्यावर तुम्हाला क्लिक करण्यापासून वाचायचे आहे.

एक सिंपल फिशिंग लिंक http:// 1a4fa3e03758. ngrok [.] io/xxbank सारखे असतात. XX इथे बँकेचे नाव असते. बँकेच्या नावाव्यतिरीक्त या लिंकच्या शेवटी  full-kyc.php असे लिहिले असते.

बहुतेक बनावट लिंकमध्ये रॅन्डम क्रमांक आणि अक्षरे असतात. याच प्रकारचा आणखी एक लिंक आहे http: //1e61c47328d5.ngrok [.] Io/xxxbank. कधी कधी लिंकला लहान किंवा शॉर्ट देखील केलं जातं. यामुळे अशा प्रकारच्या लिंकवर देखील क्लिक करु नका.

तुम्ही हे लक्षात घ्या की, बँक तुम्हाला कोणतीही माहिती अशी ऑनलाईन भरायला सांगु शकत नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका. जर तसच काही असेल तर बँकेच्या helpline नंबरवर कॉल करुन या संबंधी माहिती घ्या आणि मगच विचार करुन पुढील कार्य करा.