नियम मोडणाऱ्या कार चालकाला बाईकस्वाराने शिकवला धडा

  रस्त्यातून जाताना वाहतुकीचे नियम पाळावे हा नियम सर्वांना माहिती आहे. पण अनेकवेळा सिग्नलला पोलीस नाही पाहून लोक विरूद्ध दिशेने गाडी टाकता. असा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यात एका बाईक स्वाराचे कौतुक केले जात आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 6, 2017, 07:17 PM IST
नियम मोडणाऱ्या कार चालकाला बाईकस्वाराने शिकवला धडा  title=

नवी दिल्ली :  रस्त्यातून जाताना वाहतुकीचे नियम पाळावे हा नियम सर्वांना माहिती आहे. पण अनेकवेळा सिग्नलला पोलीस नाही पाहून लोक विरूद्ध दिशेने गाडी टाकता. असा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यात एका बाईक स्वाराचे कौतुक केले जात आहे. 

दरम्यान हा व्हिडिओ निलय वर्मा या व्यक्तीने आपल्या फेसबूक प्रोफाईलवर शेअर केला आहे. यात त्याने बाईकस्वाराचे कौतुक केले आहे. एका मोठ्या एसयूव्हीने विरूद्ध दिशेने आपली कार टाकली. त्याला विरोध म्हणून एका बाईकस्वाराने आपली बाईक समोर ठेवली. त्याला पुढे जाऊ देत नव्हता. 

बाईकस्वाराला घाबरविण्यासाठी त्याने त्याच्यावर मोठी एसयूव्ही टाकण्याचा प्रयत्न केला. पण बाईकचालक घाबरला नाही. बाईकचालकाचे म्हणणे होते की तू आपली गाडी मागे घे. तू विरूद्ध दिशेने बाईक टाकली आहे. त्यावर कार चालक त्याला शिव्या द्यायला लागला. पण हा पठ्ठा हटला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. 

बाईकस्वार हटत नाही हे पाहिल्यावर कारचालक खाली उतरला आणि त्याने बाईकस्वाराला मारहाण केली. यावेळी उपस्थित जमावाने त्यांचे भांडण सोडवले. अखेर कारचालकाला आपली कार मागे घ्यावी लागली.