Ola Electric : एका सेकंदाला 4 ई-स्कूटरची विक्री, एका दिवसात 600 कोटी रुपयांची बुकिंग

ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे

Updated: Sep 16, 2021, 07:40 PM IST
Ola Electric : एका सेकंदाला 4 ई-स्कूटरची विक्री, एका दिवसात 600 कोटी रुपयांची बुकिंग title=

मुंबई : ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे की बुधवार 15 सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यापासून कंपनीला 600 कोटी रुपयांच्या एस 1 (S1) इलेक्ट्रिक स्कूटरचं बुकिंग मिळाले आहे. कंपनीने दावा केला आहे की त्याने प्रति सेकंद चार ओएलए एस 1 (OLA S1) इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

याबरोबरच कंपनीने आतापर्यंत 86 हजार स्कूटरच्या विक्री ऑर्डरचा टप्पा गाठला आहे. ऑटोमोबाईल उद्योगातील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. गुरुवारी बुकिंगचा शेवटचा दिवस आहे आणि मध्यरात्रीनंतर विक्री बंद होईल. ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर एस 1 प्रोची (S1 Pro) किंमत 1.30 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम आहेत आणि प्रत्येक राज्याच्या सबसिडीवर अबलंबून आहेत. 

ओला ए 1 एकदा चार्ज केल्यावर 120 किमी अंतर कापू शकते. तर एस 1 प्रो ची रेंज 180 किमी आहे. S1 Pro ला मोठी बॅटरी मिळते, तर त्याचा टॉप स्पीड 115 kmph आहे. ओला एस 1 मॉडेलमध्ये 2.98 kWh बॅटरी आहे, तर एस 1 प्रोमध्ये 3.97 kWh बॅटरी आहे.

दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0 इंच टच डिस्प्लेसह येतात, ज्यात नेव्हिगेशन फिचरही आहे. या स्कूटरला डिस्प्ले 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटीचीही सुविधा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीसाठी ओलाने 10 हजार महिलांना काम दिलं आहे आणि वर्षाला 20 लाख स्कूटर बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतही या स्कूटरची निर्यात केली जाईल. ओला ने 'डायरेक्ट टू होम सेल्स मॉडेल'ची निवड केली आहे. त्यामुळे कोणत्याही शोरुममध्ये याची विक्री होणार नाही. इच्छुक ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करावं लागले, तसंच 499 रुपयांची बुकिंग रक्कम भरून स्कूटर बुक करता येईल. नोंदणीनुसार ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी देण्यात येणार आहे.

कंपनीच्या मते, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी आणि डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरू होईल. कंपनी त्यांच्या स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कर्ज आणि ईएमआय सुविधा देखील देत आहे. ओला इलेक्ट्रिकने 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एस 1 स्कूटर प्रति महिना 2,999 रुपयांच्या समान मासिक हप्त्यावर (EMI) उपलब्ध होईल. इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 प्रोच्या अॅवव्हान्स आवृत्तीसाठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल.