तुमच्या Aadhaar Card वर किती SIM रजिस्टर आहेत? जाणून घ्या

तुमच्य़ा आधार कार्डचा वापर करून कोणी SIM वापरतंय का? या वेबसाइटवरून जाणून घ्या सोप्या पद्धतीत 

Updated: Aug 28, 2022, 09:49 PM IST
तुमच्या Aadhaar Card वर किती SIM रजिस्टर आहेत? जाणून घ्या  title=

मुंबई : आजकाल ड्यूएल सीमचा जमाना आहे, त्यामुळे प्रत्येकाचे दोन सीम आहेत. मात्र अनेकदा गुन्ह्याच्या घटनांमध्ये पाहिले गेले आहे की नंबर दुसराच कोणी वापरत असतो आणि कागदपत्रे दुसऱ्याचीच असतात. हा प्रकार खुबदा एखाद्या गुन्ह्याच्या घटने दरम्यान समोर आला आहे. त्यामुळे तुमच्या ऐवजी तुमच्या नावावर ही कोणी सीम वापरतोय का? असा साहजिक प्रश्न तुमच्या मनात आला असेल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तपासाव लागेल.  

आधार कार्ड आता एक महत्वाचे ओळखपत्र बनले आहे. त्यामुळे आता अनेक गोष्टी आधार कार्डशी लिंक झाल्या आहेत. हे सिमकार्ड घेतानाही वापरले जाते. जुने सिमकार्ड आधार कार्डशीच लिंक करण्यास सांगितले आहे. परंतु, अनेकवेळा असे घडते की आपल्या आधार कार्डवर किती सिम जारी केले आहेत याची आपल्याला माहितीच नसते. यामुळे, वापरकर्ते कधी कधी फसवणुकीचे बळी देखील होतात. 

पण, त्याचा शोध घेता येतो. याबद्दल एक अतिशय सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाइटची मदत घ्यावी लागेल. ही वेबसाइट दूरसंचार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोर्टलला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर किंवा TAFCOP असे नाव देण्यात आले आहे.

DoT वेबसाइटवर तपासा
दूरसंचार विभागाची ही वेबसाइट अतिशय उपयुक्त आहे. तुम्हाला प्रथम ब्राउझरवर जाऊन https://tafcop.dgtelecom.gov.in/ ही वेबसाइट उघडावी लागेल. वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला त्यात तुमचा प्राथमिक क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ओटीपीसाठी विनंती करावी लागेल.

तुमच्या फोन नंबरवर OTP पाठवेल. त्यानंतर तुम्ही हा OTP तेथे टाका. ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर, तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक केलेले सर्व मोबाइल नंबर येथे दाखवले जातील. विशेष म्हणजे तुम्हाला अनधिकृत मोबाईल नंबर देखील दाखवले जातील. 

फोन नंबर बंद करता येणार
तुम्ही या साईटवरून तुमचा नसलेला क्रमांक बंद करण्याची विनंती देखील नोंदवू शकता. तथापि, ही सेवा अद्याप संपूर्ण भारतात उपलब्ध नाही. हे सध्या आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित राज्यांसाठी लवकरच ते उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.