Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, काय आहे नवं फीचर ?

G pay वापरणाऱ्यांसाठी नवं फीचर

Updated: Mar 12, 2021, 04:26 PM IST
Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, काय आहे नवं फीचर ? title=

मुंबई : डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत आज सगळेच लोकं ऑनलाईन व्यवहार करतात. ही एक सुरक्षित व्यवहार प्रणाली आहे. भारतात आता अनेक डिजीटल पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. Google Pay ने मात्र आता त्यांच्या यूजर्ससाठी काही नव्या गोष्टी आणल्या आहेत. गुगल पे वापरणारे लोकं भारतात जास्त आहेत. 

नव्या फीचरनुसार कंपनी युजर्सला आता अतिरिक्त प्रायवसीसह व्यवहार करताना अधिक कंट्रोलची सुविधा देणार आहे. Google Pay ची ही नवी सुविधा काय आहे.?

भारतात  Google पे यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये आणखी वाढ करणार आहे. ज्यामध्ये आणखी सुविधा मिळणार आहे. युजर्सला ऐपमध्ये येणाऱ्या अॅड्स आणि ऑफरवर देखील कंट्रोल ठेवता येणार आहे.

नव्या प्रायवसी पॉलिसीवर बोलायचं झालं तर, गूगल पेचे वाईस प्रेसिडेंट (प्रोडक्ट) अंबरीश केंघे यांनी म्हटलं की, 'प्रायवसी ही आमची प्राथमिकता आहे. आता आण्ही गूगल पे वर तुमची एक्टिविटी मॅनेज करण्यासाठी तुम्हाला अधिकार देणार आहोत. तुम्ही गूगल पे वर जर काही व्यवहार करत असाल तर तुम्हाला ऐपची सेवा पर्सनलाईज करण्यासाठी ते रेकॉर्ड ठेवायचे की नाही. असं विचारलं जाणार आहे.'

नव्या फीचरनुसार तुम्हाला तुमचे व्यवहार आणि हिस्ट्री डिलीट करता येणार आहे. व्यवहार सेव्ह करायचे असतील तर सेव्हही करता येणार आहे. युजरला शेवटचे 10 UPI ट्रांजेक्शन डिलीट किंवा टोकननाइज्ड करता येणार आहे.

कंपनीने म्हटलं आहे की, हे नवे फीचरमुळे प्रायवेट डेटाचा गैरव्यवहार होणं टाळता येणार आहे. UPI शिवाय कंपनी यूजरला कॉन्टॅक्टलेस कार्ड ट्रांजेक्शन करण्याची सुविधा देखील देणार आहे. यासाठी टोकननाइज्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. तो त्यांच्या फोनची लिंक असेल.

यूजर आता त्यांना ऑफर किंवा रिवॉर्डसाठी त्यांचा डेटा वापरायचा की नाही याबाबत देखील निर्णय घेऊ शकतात.

गूगल पे चा हा अपडेट वर्जन पुढच्या आठवड्यात रिलीज होणार आहे. यासाठी आधी गूगल पे यूजरला विचारलं जाईल की, त्यांना कंट्रोलला ऑन करायचे आहे की नाही. जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तो ऑन करु शकता.