8 धोकादायक अॅप आले समोर, तुमचं बँक अकाऊंट करु शकतात रिकामं

हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेले तर नाहीत ना...

Updated: Mar 11, 2021, 09:21 PM IST
8 धोकादायक अॅप आले समोर, तुमचं बँक अकाऊंट करु शकतात रिकामं title=

मुंबई : विचार न करता कोणतेही अॅप डाऊनलोड करणे खूप धोकादायक असू शकते. संशोधकांनी अलीकडेच अँड्रॉइड वापरणाऱ्यांना एक गंभीर इशारा दिला आहे. Google Play Store वर 8 धोकादायक अॅप्स आढळले आहेत जे आपले बँक खाते रिकाम करु शकते. इतकेच नाही तर, ते टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील बायपास करण्यात सक्षम आहेत. संशोधकांनी सांगितले की, आपल्या फोनवर हे कोणतेही अॅप्स इन्स्टॉल असतील तर ते त्वरित काढून टाका.

चेक पॉईंट रिसर्चने आपल्या अहवालात ही माहिती दिली. अहवालात 'क्लॅस्ट 82' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मालवेयर ड्रॉपरचा उल्लेख आहे, जो या आठ अॅप्सद्वारे पसरत होता. ड्रॉपर बद्दल सर्वात भयानक गोष्ट अशी आहे की त्याद्वारे पसरविलेले मालवेअर लोकांचे आर्थिक नुकसान करते. हा ड्रॉपरसुद्धा गुगल प्ले प्रोटेक्टच्या पकडातून सुटू शकला आहे.

हे मालवेअर ड्रॉपर किती धोकादायक

हे ड्रॉपर युजर्सच्या फोनमध्ये एलियनबॉट बँकर स्थापित करतो. जो तुमच्या बँकेच्या अॅपमध्ये जावून तेथील माहिती चोरु शकतो. संशोधकांनी सांगितले की, “डिव्हाइसला आपल्या नियंत्रणात घेतल्यानंतर, हँकर्स फोनच्या इतर फंक्शन्सवरही नियंत्रण ठेवू शकतात. ते आपल्या फोनमध्ये एक नवीन अॅप इन्स्टॉल करु शकतात. ज्याच्या माध्यमातून आपल्या बँकेतील रक्कम ते उडवू शकतात.

8 धोकादायक App कोणते?

1. Cake VPN (com.lazycoder.cakevpns)
2. Pacific VPN (com.protectvpn.freeapp)
3. eVPN (com.abcd.evpnfree)
4. BeatPlayer (com.crrl.beatplayers)
5. QR/Barcode Scanner MAX (com.bezrukd.qrcodebarcode)
6. Music Player (com.revosleap.samplemusicplayers)
7. tooltipnatorlibrary (com.mistergrizzlys.docscanpro)
8. QRecorder (com.record.callvoicerecorder)

प्रथम सेटिंग्जवर जा. त्यानंतर अॅप्समध्ये जा. वर दिलेले अॅप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेले नाहीत ना हे तपासून घ्या. काही तुम्हाला संशय आल्यास तुमचा पासवर्ड आणि बँकिंग लॉगिंनचा पासवर्डही बदलून टाका.