मुंबई : बाजारात सध्या अँड्राईड स्मार्टफोन्सचा दबदबा असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हीही स्मार्टफोन युजर्स आहात तर तुम्हाला काही टिप्स जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरुन तुमचा स्मार्टफोन चांगला राहील. या टिप्स वापरल्यानंतर तुमचा स्मार्टफोन हँग ही होणार नाही आणि गरमही होणार नाही. पाहूयात का आहेत या टिप्स...
फोन हँग होणं किंवा गरम होणं ही एक साधारण गोष्ट आहे. तुमच्या स्मार्टफोनचा रॅम फुल झाल्यावर फोन हँग होण्यास सुरुवात होते. तसेच फोनमध्ये व्हायरस असल्यावरही फोन हँग होतो. त्यामुळे तुम्हाला फोनमध्ये अँटी व्हायरस सारखा अॅप इंस्टाल करणं गरजेचं आहे. तसेच फोनचा रॅम जितका जास्त फ्री ठेवता येईल तितका ठेवण्याचा प्रयत्न करावा.
आपल्यापैकी बहुतांश स्मार्टफोन युजर्सला बॅटरीची समस्या जाणवत असते. घरातून बाहेर पडल्यानंतर फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली तर कुठं चार्ज करावी असा प्रश्न उद्भवतो. तसेच फोन चार्ज करण्याची सुविधा नसल्यास फोन स्विच ऑफ होतो.
तुम्हालाही फोनच्या बॅटरीची समस्या सतावत असेल तर एक अॅप तुमची मदत नक्की करेल. या अॅपचं नाव आहे greenify. हे अॅप तुमची बॅटरी ऑप्टमाइज करण्याचं काम करेल.