स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ...

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, आता भारतीय बाजारपेठेत एक नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

Updated: May 31, 2018, 10:04 AM IST
स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ... title=
Image: tambomobiles twitter

नवी दिल्ली : तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, आता भारतीय बाजारपेठेत एक नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. टंबो (Tambo) मोबाईल्सने बुधवारी भारतीय बाजारपेठेत आपला TA-3 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. चला तर मग पाहूयात या फोनची किंमत आणि फिचर्स...

TA-3 या स्मार्टफोनमध्ये 4.95 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आलं आहे. हा फोन जेट ब्लॅक, चॅम्पियन आणि मेटॅलिक ब्ल्यू कलर्समध्ये उपलब्ध आहे.

TA-3 या स्मार्टफोनमध्ये फेस रेकग्नेशन फिचरही देण्यात आलं आहे. तसेच फोनमध्ये MediaTek 6737 क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. TA-3 स्मार्टफोन 16GB रोमसह लॉन्च केला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत 5 MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेऱ्यात फेस ब्युटी, बर्स्ट मोड सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना 200 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी देण्यात येत आहे. तसेच 365 दिवसांत ग्राहक या स्मार्टफोनची स्क्रिनही रिप्लेस (बदलू) शकतात.