आता ATM मधून पैसे काढणं महागणार, पाहा किती चार्ज आणि टॅक्स भरावा लागणार

तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.

Updated: Aug 21, 2022, 03:32 PM IST
आता ATM मधून पैसे काढणं महागणार, पाहा किती चार्ज आणि टॅक्स भरावा लागणार title=

ATM Cash Withdrawal Charges : बँक खातं वापरणारे खातेधारक सर्रास पैसे कढण्यासाठी एटीएमचा (ATM) वापर करतात. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक सेवांचा (Non-financial services) समावेश आहे. नवीन नियमांनुसार आता तुम्हाला 1 महिन्यात निर्धारित एटीएम पेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

कोणत्या बँकेचे नवीन नियम आहेत

SBI:  मेट्रो शहरांमध्ये विनामूल्य व्यवहारांची संख्या 3 पर्यंत मर्यादित आहे. पण SBI ATM  मोफत मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठीचे व्यवहार 10 रुपये आकारतात. SBI इतर बँकेच्या एटीएममधील अतिरिक्त आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 20 रुपये आकारते. शुल्काव्यतिरिक्त, ग्राहकाच्या खात्यातून लागू जीएसटी देखील आकारला जातो.

PNB: PNB ATM मध्ये महिन्याचे 5 व्यवहार मोफत देते. तसेच, कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी 10 रुपये शुल्क भरावे लागेल. PNB व्यतिरिक्त इतर बँकांच्या ATM मधून व्यवहार करण्याचे नियम वेगळे आहेत. मेट्रो शहरात 3 मोफत व्यवहार आणि नॉन-मेट्रो शहरात 5 मोफत व्यवहारांचा नियम आहे. इतर बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेनंतर आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार करण्यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते.

HDFC: HDFC Bank च्या एटीएममधून महिन्याभरात फक्त पहिले 5 पैसे काढणे मोफत आहे. रोख पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहारासाठी 20 रुपये अधिक कर, गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 8.5 रुपये अधिक कर. 6 मेट्रो शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू) इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये 3 विनामूल्य व्यवहारांना परवानगी आहे. महिनाभरात इतर ठिकाणी 5 विनामूल्य व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक) करण्याची परवानगी आहे. इतर बँकेच्या एटीएम किंवा मर्चंट आउटलेटमध्ये पुरेशी शिल्लक, जर व्यवहार नाकारला गेला, तर रु.25 चे शुल्क भरावे लागेल.

ICICI: एका महिन्यात ICICI ATM मधून 5 व्यवहार मोफत आहे. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 20 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. ही मर्यादा आर्थिक व्यवहारांसाठी आहे तर बिगर आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये अधिक जीएसटी आहे.

Axis Bank: Axis Bank च्या एटीएममधून एका महिन्यात 5 आर्थिक व्यवहार विनामूल्य आहेत. मेट्रो शहरांमध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक 3 व्यवहार विनामूल्य आहेत. इतर ठिकाणी एका महिन्यात 5 व्यवहार मोफत आहेत. ॲक्सिस आणि नॉन-ॲक्सिस एटीएममधून मर्यादेबाहेर रोख रक्कम काढल्यास प्रति व्यवहारासाठी 21 रुपये द्यावे लागतील.

यामुळे व्यवहार शुल्क वाढले आहे

एटीएम मशिन बसवणे आणि देखभालीशी संबंधित बँकांच्या खर्चात वाढ झाल्याने व्यवहार शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या शेवटी, देशभरात 1,15,605 ‘ऑनसाइट’ (बँकेच्या परिसरात) एटीएम आणि 97,970 ‘ऑफसाइट’ (बँकेच्या जागेव्यतिरिक्त) एटीएम होते.