विकेट खराब नव्हती पण ही बॉलर्सची मॅच होती - कोहली

भारतानं जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट मॅच तीन दिवसांच्या आत जिंकली. तरी कॅप्टन कोहलीनं म्हटलं की, विकेटमध्ये काही कमतरता नव्हती. पण त्यानं कबुल केलं ही मॅच बॉलर्सची होती.

Updated: Nov 8, 2015, 05:01 PM IST
विकेट खराब नव्हती पण ही बॉलर्सची मॅच होती - कोहली title=

मोहाली: भारतानं जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट मॅच तीन दिवसांच्या आत जिंकली. तरी कॅप्टन कोहलीनं म्हटलं की, विकेटमध्ये काही कमतरता नव्हती. पण त्यानं कबुल केलं ही मॅच बॉलर्सची होती.

जिंकण्यासाठी अवघ्या 218 रन्सचा पाठलाग करतांना दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 109 रन्सवर ऑल आऊट झाली.

कोहलीनं मॅचनंतर सांगितलं, 'मला नाही वाटत की, विकेटमध्ये काही कमी होती. बॅट्समननी प्रयत्न नाही केला. मात्र ही बॉलर्सची मॅच होती.' कोहली पुढे म्हणाला,'आम्हांला वाटलं की, जर या विकेटवर आम्ही रन्स बनवू शकत नाही आहोत. तर त्यांनाही कठीण जाईल.' मुरली विज. (75 आणि 47) आणि चेतेश्वर पुजारा (77) नं भारतासाठी चांगली बॅटिंग केली.

आणखी वाचा - मोहाली कसोटीत टीम इंडियाचा शानदार विजय

कोहली म्हणाला, 'अशा परिस्थितीत मानसिक बळाची आवश्यकता असते. विजय आणि पुजारा दोघंही खूप मजबूत खेळाडू आहेत. जर आम्ही अधिक प्रयत्न केला असता, तर दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य ठेवू शकलो असतो.' 

पहिल्या इनिंगमध्ये 38 रन्स करण्यासोबतच 8 विकेट घेणाऱ्या मॅन ऑफ मॅच ठरलेल्या रविंद्र जडेजाचं कौतुक करत कोहली म्हणाला, 'मी त्याच्यासाठी आनंदी आहे. त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये विकेट घेत वापसी केली. आता त्याला चांगलं वाटत असेल.'

आणखी वाचा - टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.