नवी मुंबई: नवी मुंबईतील दिघ्यात एक धक्कादायक प्रकरण पुढे आलंय. चार आणि आठ महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झालाय. मुलीच्या प्रेम प्रकरणातून दिपक वाल्मिकी या आरोपीनं तिच्या भावाची हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर वाल्मिकीनं पारसिक डोंगररांगांमध्ये हत्या करून त्याचं डोकं वेगळं केलं ते जमिनीत गाडलं आणि धड शेजारील तलावात टाकलं.
घटना नवी मुंबईच्या दिघा इथली आहे. इथं राहणाऱ्या शब्बीर अन्सारीच्या बहिणीवर आरोपी दिपक वाल्मिकीचं प्रेम होतं. या प्रेमप्रकरणाला शब्बीरनं विरोध केला असता दिपकनं आपल्या मित्रांसोबत मिळून शब्बीरची चार महिन्यांपूर्वी हत्या केली. त्याचं शीर धडापासून वेगळं करून शीर गाडलं आणि धड तलावात फेकलं.
तपासात पोलिसांनी आणखीच एका वेगळा प्रकार उघडकीस आणला. तो म्हणजे याच आरोपींनी आठ महिन्यापूर्वी सोहेल कुरेशी नावाच्या तरुणाचीही तशीच हत्या केली होती. दिपक आणि शब्बीरच्या बहिणीचं मोबाईलवरील संभाषण सोहेलच्या फोनमधील मेमरी कार्डमध्ये होतं. त्यावरून सोहेलनं दिपकला ब्लॅकमेल केलं म्हणून दिपक वाल्मिकीनं सोहेलचीही हत्या केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी दिपक वाल्मिकी आणि महंमद जाहीद या दोघांना अटक केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.