ना वाढणार लठ्ठपणा, ना कोलेस्ट्रॉल... जाणून घ्या कसं!

हिवाळा येताच सर्व प्रकारच्या भाज्या भूकेसोबतच आपला मोहही वाढवतो. त्यामुळं हिवाळ्यात अधिक जेवण जातं. हिवाळ्यात पचनक्रिया चांगली असते. मात्र कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल वाढतोत. हेल्दी जेवणासोबत अनहेल्दी सवयींपासून कसं दूर राहता येईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या काही हेल्दी सवयी ज्यामुळं आजारांपासून आपण हिवाळ्यात दूर राहाल आणि तुमचा लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.

Updated: Nov 8, 2015, 05:53 PM IST
ना वाढणार लठ्ठपणा, ना कोलेस्ट्रॉल... जाणून घ्या कसं! title=

मुंबई: हिवाळा येताच सर्व प्रकारच्या भाज्या भूकेसोबतच आपला मोहही वाढवतो. त्यामुळं हिवाळ्यात अधिक जेवण जातं. हिवाळ्यात पचनक्रिया चांगली असते. मात्र कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल वाढतोत. हेल्दी जेवणासोबत अनहेल्दी सवयींपासून कसं दूर राहता येईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या काही हेल्दी सवयी ज्यामुळं आजारांपासून आपण हिवाळ्यात दूर राहाल आणि तुमचा लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.

आणखी वाचा - तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

पाणी पित राहा
हिवाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि हार्ड ड्रिंक्स करण्यापासून वाचा. चहा आणि कॉफी या सिझनमध्ये नेहमी पेक्षा अधिक होते. त्यामुळं याचा वापर पण कमी करा. पाणी भरपूर प्या. पाणी रूम टेंपरेटरचंच असेल याची काळजी घ्या. जास्त थंड पाणी आरोग्यासाठी चांगलं नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही.

जेवण सोडू नये
या काळात कोणत्या ना कोणत्या कारणानं जेवण अधिक होतं आणि त्याला ठीक करण्यासाठी लंच किंवा डिनर सोडणं आपल्याला योग्य वाटतं. पण असं करणं चुकीचं आहे. जेवण कधीही सोडू नये. त्याचं प्रमाण मात्र आपण कमी करावं. भात आणि तेलकट पदार्थ कमी करावेत. त्यामुळं आपली पाचनक्रिया चांगली राहिल.

डेझर्टचं प्रमाण कमी करावं

हिवाळ्यात डेझर्टचं प्रमाण आपणहून अधिक वाढतं. यावर लक्ष ठेवा. दिवसातून चार पैकी एकाच आहारात डेझर्ट घ्या. आइसक्रीम आणि डोनट सारखे डेझर्ट खाण्यापासून थांबा. यात फॅट्सचं प्रमाण अधिक असतं.

ताजी फळं खा
या सिझनमध्ये घरात असलेले स्नॅक्स आणि मिठाई खात बसू नये. दिवसातून एखाद वेळेस ते खाल्लं तर ठीक आहे. दिवसांत इतर वेळी कधीही भूक लागली तर ताजी फळं खावी. यामुळं एनर्जी मिळेल आणि भूक पण मिटेल.

व्यायाम करायला विसरू नका
या सिझनमध्ये आळस आणि मन दोन्हीही सकाळी उठू देत नाही. कंटाळा येतो... त्यामुळं व्यायाम करायची इच्छा होत नाही. पण तसं न करता वेळ काढून काही वेळ तरी वॉक वर जावं. वॉक केल्यानं आपल्या बॉडी मसल्स पहिले सारखे काम करतात आणि आपला थकवा दूर होतो. दररोज 15 मिनीटांचा व्यायाम उपयुक्त ठरतो.

झोप खूप गरजेची
एक्सपर्ट म्हणतात की, जेवण केल्यानंतर चार तासांनंतर झोपावं. यामुळं जेवण पूर्णपणे पचतं... जर या चार तासांत पुन्हा भूक लागली तर ताजी फळं खा. कमीतकमी आठ तासांची झोप आवश्यक आहे. यामुळं शरीराला आणि मेंदूला पूर्णपणे आराम मिळतो आणि आपण दुसऱ्या दिवशी फ्रेश राहता. 

आणखी वाचा - OMG: १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर प्रेग्नेंट झाली ही तरुणी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.