आजपासून रेल्वे, विमान प्रवास, हॉटेलमधील जेवण, मोबाईल फोन महाग

देशात स्वच्छतेला वाव देण्यासाठी चौदा टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आलाय. आजपासून हा कर लागू झाल्यानं आज रविवारपासून उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागणार आहे. केवळ रेल्वेच नाही तर तब्बल १२० सेवा यामुळे महाग होणार आहेत.

Updated: Nov 15, 2015, 07:12 PM IST
आजपासून रेल्वे, विमान प्रवास, हॉटेलमधील जेवण, मोबाईल फोन महाग  title=

नवी दिल्ली: देशात स्वच्छतेला वाव देण्यासाठी चौदा टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आलाय. आजपासून हा कर लागू झाल्यानं आज रविवारपासून उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागणार आहे. केवळ रेल्वेच नाही तर तब्बल १२० सेवा यामुळे महाग होणार आहेत.

यात रेल्वे, विमान प्रवास, हॉटेलमधील जेवण, हॉटेलमध्ये राहणं, बँकिंग, कपडे धुणे, मोबाईल कंपन्यांच्या सेवा, केबल, कुरिअर, कोचिंग, लग्न-मंडप, पंडाल, स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग, घर बांधणं, जाहिरात, रेडिओ, टॅक्सी, घरभाडं, जिम इत्यादी सेवा महागणार आहेत. या सेवांवर १४ टक्के सर्व्हिस टॅक्स सोबतच आता ०.५ टक्के अधिक वसूल केले जातील. जे स्वच्छ भारतासाठी असेल.

रेल्वे मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार प्रथम श्रेणी आणि सर्व एसी श्रेणीचे रेल्वेभाडे १५ नोव्हेंबरपासून ४.३५ टक्क्यांनी वाढणार आहे.

सरकारने ६ नोव्हेंबर रोजी सेवाकराच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व सेवांवर १५ नोव्हेंबरपासून ०.५ टक्का या दराने स्वच्छ भारत अधिभाराची अधिसूचना जारी केली होती. १५ नोव्हेंबरपूर्वीच्या तिकिटांसाठी हा उपकर नसेल. सर्वसाधारण आणि शयनयान श्रेणीच्या प्रवास भाड्यावर अधिभार लागणार नाही. एकूण प्रवास भाड्यापैकी ३० टक्क्यांवर १४ टक्के सेवा कर आणि स्वच्छ भारत उपकर (०.५ टक्का) लागू होणार आहे. 

आणखी वाचा - दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं

या भाडेवाढीमुळे नवी दिल्ली-मुंबई प्रवासासाठी मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत एसी-१ प्रवास भाडे २०६ रुपयांनी, तर नवी दिल्ली- हावडासाठी एस-३चे प्रवास भाडे १०२ रुपयांनी वाढले. दिल्ली-चेन्नईसाठी एसी-२चे भाडे १४० रुपयांनी वाढेल. सेवा कर आणि स्वच्छ भारत अधिभारामुळे एका वर्षात १ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.