team anna

अण्णांनी मागितली माफी, 'आंदोलन इथेच थांबवेन'

टीम अण्णांच्या वतीने अण्णा हजारे यांनी माफी मागितली आहे. अण्णा हजारे यांनी पत्रकारांची माफी मागितली, आणि दु:खही व्यक्त केलं. अण्णांच्या समर्थकांनी मीडियाशी हुल्लडबाजी केल्याने अण्णांनी स्वत: माफी मागितली आहे.

Jul 31, 2012, 04:08 PM IST

पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णा समर्थकांचं आंदोलन

दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.

Jul 29, 2012, 12:00 AM IST

टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'

आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.

Jul 27, 2012, 04:42 PM IST

'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.

Jul 26, 2012, 08:47 PM IST

'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार

नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.

Jul 26, 2012, 11:03 AM IST

टीम अण्णांच्या आंदोलनाचा पहिला दिवस

प्रभावी लोकपाल विधेयक आणि १४ मंत्र्यांविरोधात कारवाई या मागणीसाठी टीम अण्णानं जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. सरकारनं दरवेळी फसवणूक केल्याचा आरोप करत, यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषणावरून हटणार नसल्याचा इरादा टीम अण्णानं व्यक्त केलाय.

Jul 26, 2012, 08:25 AM IST

अण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम

15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.

Jul 24, 2012, 07:00 PM IST

अण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट

अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.

Jul 18, 2012, 11:03 PM IST

टीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा

अखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

Jul 7, 2012, 09:32 PM IST

टीम अण्णा सदस्यावर जीवघेणा हल्ला

आरटीआय कार्यकर्ता आणि टीम अण्णामधील सदस्य अखिल गोगोई वर काही काँग्रेस कार्यकार्त्यांनी आसाममधल्या नलबाडीमध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Jul 7, 2012, 09:37 AM IST

टीम अण्णाची मुस्कटदाबी, उपोषण नाकारले

टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये

Jul 5, 2012, 05:06 PM IST

टीम अण्णांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तर

पंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्यात आलं आहे.

Jun 10, 2012, 09:43 AM IST

अण्णांच्या संघटनांमध्ये मतभेद

भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जनआंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं.

Jun 6, 2012, 10:12 AM IST

टीम अण्णा- रामदेव बाबा यांच्यात वाद

बाबा रामदेव यांच्या लाक्षणिक उपोषणा दरम्यान बाबा आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले. आपल्या भाषणात केजरीवाल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.

Jun 3, 2012, 06:25 PM IST

किरण बेदींची पूनम पांडेला 'टीम अण्णा'ची ऑफर

पूनम पांडेला तिचे फोटो पाहून जास्तीत जास्त एखाद्या बॉलिवूडच्या हॉट फिल्मची ऑफर येईल असं वाटत होतं. पण, पूनमला ऑफर आली आहे ती चक्क टीम अण्णाची सदस्य होण्यासंबंधी.

Jun 1, 2012, 07:19 PM IST