team anna

अण्णा हजारे यांची नवी टीम

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना रामराम केल्यानंतर दोन महिन्यांनी अण्णांनी नवी टीम जाहीर केली.

Nov 11, 2012, 09:43 AM IST

मी टीम अण्णा फोडली नाही- बाबा रामदेव

टीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्याचं सध्या दिसतंय.

Sep 22, 2012, 05:49 PM IST

`आमचे मार्ग वेगळे, ध्येय एकच`

माजी टीम अण्णांमध्ये आता दुफळी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द अण्णा हजारेंनीच तशी कबुली दिलीय.

Sep 18, 2012, 04:31 PM IST

केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल

टीम अण्णांच्या काही सदस्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, प्रशांत भूषण, नीरज कुमार आणि गोपाळ राय या टीम अण्णामधील सदस्यांवर दंगल भडकवण्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

Aug 28, 2012, 08:15 AM IST

बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’

टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.

Aug 9, 2012, 04:04 PM IST

टीम अण्णाचं 'भूत उतरलं'- बाळासाहेब

आजच्या ‘सामना’मधून बाळासाहेबांनी टीम अण्णांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. ‘भूत उतरले’ अशा नावाचाच अग्रलेख लिहून त्यात टीम अण्णांची बरखास्ती म्हणजे जनतेच्या मानगुटीवर बसलेलं भूतच उतरलं असल्याची भावना सामनामध्ये व्यक्त केली आहे.

Aug 9, 2012, 05:06 AM IST

अण्णा 'टीम अण्णा'वर नाराज?

टीम अण्णा बरखास्त करण्यात आलीय. अण्णांनी ब्लॉगवर याची घोषणाही केली. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, की अण्णा टीमवर नाराज आहेत का?

Aug 7, 2012, 12:14 AM IST

अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.

Aug 6, 2012, 02:42 PM IST

'टीम अण्णांचा निर्णय घाईघाईत' - मेधा पाटकर

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांचा निर्णय म्हणजे ‘घाईघाईत घेतलेला निर्णय’ असल्याचं म्हटलंय.

Aug 5, 2012, 11:53 PM IST

अण्णा समर्थकांनीच जाळला अण्णांचा पुतळा

जंतर मंतरवरचं उपोषण थांबवून आता टीम अण्णांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देशभरातील सामान्य नागरिकांचा जरी पाठिंबा असला, तरी त्यांच्यावर टीकाही तेवढीच होत आहे.

Aug 4, 2012, 03:04 PM IST

अण्णांच्या निर्णयाचे स्वागत, विरोध आणि ऑफर

सरकारने जनतेचा आवाज ऐकण्यास नकार दिल्यामुळंच उपोषण सोडण्याचा निर्णय घेऊन राजकीय पर्याय निर्माण करण्याची घोषणा केल्याचं स्पष्टीकरण टीम अण्णाचे सदस्य मनीष सिसोदिया यांनी दिलंय.

Aug 3, 2012, 04:36 PM IST

अण्णांचा एल्गार!

 

 

 

 

 

---- 

Aug 2, 2012, 03:05 PM IST

'अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या'

टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.

Aug 2, 2012, 01:57 PM IST

टीम अण्णांना दिल्ली पोलिसांची तंबी

जनलोकपाल बिल मंजूर करावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या टीम अण्णांना पोलिसांनी दमबाजी करण्यास सुरूवात केली आहे. तु्म्ही भाषण करताना वातावरण बिघडवू नका, असे सांगत तंबीची भाषा केली आहे.

Aug 1, 2012, 07:06 PM IST

आत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.

Aug 1, 2012, 04:39 PM IST