टीम अण्णा सदस्यावर जीवघेणा हल्ला

आरटीआय कार्यकर्ता आणि टीम अण्णामधील सदस्य अखिल गोगोई वर काही काँग्रेस कार्यकार्त्यांनी आसाममधल्या नलबाडीमध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Updated: Jul 7, 2012, 09:37 AM IST

www.24taas.com, गुवाहटी

 

आरटीआय कार्यकर्ता आणि टीम अण्णामधील सदस्य अखिल गोगोई वर काही काँग्रेस कार्यकार्त्यांनी आसाममधल्या नलबाडीमध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे समजते.

 

अखिल गोगोई धरमपूर गावात आलेल्या पूराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यावेळेस त्याच्यावर काठ्या आणि धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.

 

नलबाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोगोईने काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे, की त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. आसमचे मंत्री नीलमणी सेन यांनी हा हल्ला करवला आहे असा गोगईने आरोप केला आहे. गोगोईंना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची स्थिती सध्या गंभीर आहे.