पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णा समर्थकांचं आंदोलन

दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.

Updated: Jul 29, 2012, 12:00 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.

जनलोकपाल आंदोलनाच्या समर्थकांनी शनिवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आज जोरदार नारेबाजी केली. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या घरावर कोळसेही फेकले. या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी गोंधळ घातला.

गेले चार दिवस टिम अण्णांचे जंतरमंतरवर उपोषण चालू असूनही सराकर त्याला दाद देत नाही. अण्णांनी चार दिवसांचा अल्टिमेटम देऊनही १५ भ्रष्ट मंत्र्यांवर सरकारने अद्याप कारवाई केली नाही. याचाच उद्रेक आज आंदोलकांमध्ये पाहाण्यास मिळाला.