मॅच फी, दोन वर्षांची बंदी... IPL 2025 च्या आधी बनवले गेले 'हे' आठ मोठे नियम

Rules For IPL 2025:  इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या सीजनपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही महत्त्वपूर्ण नियम तयार केले आहेत.

Updated: Sep 29, 2024, 12:09 PM IST
मॅच फी, दोन वर्षांची बंदी... IPL 2025 च्या आधी बनवले गेले 'हे' आठ मोठे नियम title=
Photo Credit: X/@IPL

BCCI Rules: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची रविवारी बेंगळुरू येथे बैठक झाली, ज्यामध्ये  काही नियमांविषयी चर्चा झाली. यामध्ये टाटा आयपीएल प्लेअर रेग्युलेशन २०२५-२०२७ वर निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल संघांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत टाटा आयपीएल प्लेअर रेग्युलेशन २०२५-२०२७ वर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या सीजनपूर्वी कोणते मोठे नियम तयार करण्यात आले आहेत ते जाणून घेऊयात. 

फ्रँचायझी रिटेन्शन
आयपीएल फ्रँचायझी रिटेंशन आणि आरटीएमसाठी त्यांचे कॉम्बिनेशन निवडणे हे त्यांच्यानुसार आहे. ६ रिटेन्शन/RTM मध्ये जास्तीत जास्त ५ कॅप केलेले खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त २ अनकॅप केलेले खेळाडू असू शकतात.

मॅच फी
प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी मिळेल. ही रक्कम त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. 

दोन सिजनसाठी बंदी
एखादा खेळाडू लिलावासाठी नोंदणी करतो आणि त्यांची निवड झाल्यानंतर, सीजन सुरू होण्यापूर्वी तो खेळाडू उपलब्ध नसल्यास त्याला पुढील टूर्नामेंट आणि लिलावात भाग घेण्यास २ सिजनसाठी बंदी घालण्यात येईल.

इम्पॅक्ट प्लेयर नियम
इम्पॅक्ट प्लेयर नियम २०२५ ते २०२७ सायकल दरम्यान सुरू राहील.

परदेशी खेळाडूला नोंदणी आवश्यक 
मेगा लिलावासाठी कोणत्याही परदेशी खेळाडूला आधी नोंदणी करावी लागेल. या मेगा लिलावासाठी परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात तो नोंदणीसाठी अपात्र ठरतील. 

लिलावाची रक्कम
इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी फ्रँचायझींसाठी लिलावाची रक्कम १२० कोटी रुपये फिक्स करण्यात आली आहे. एकूण वेतन कॅपमध्ये आता लिलावाची रक्कम, वाढीव कामगिरी वेतन आणि सामना शुल्क हे समाविष्ट असेल. या आधी २०२४ मध्ये एकूण पगार मर्यादा ही ११० कोटी रुपये होती, जी आता रुपये १४६ कोटी (२०२५), रुपये १५१ कोटी (२०२६) आणि रुपये १५७ कोटी (२०२७) होईल.

राईट टू मॅचचा पर्याय 

आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या सध्याच्या संघातील एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. हे करण्यासाठी ते रिटेंशनद्वारे किंवा राईट टू मॅच हा पर्याय वापरू शकतात. 

 कॅप्ड-अनकॅप्ड

एखाद्या कॅप्ड भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गेल्या पाच वर्षात प्लेइंग ११ मध्ये खेळला नसेल किंवा बीसीसीआयचा केंद्रीय करार नसेल तर तो खेळाडू अनकॅप्ड होईल.हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असेल.