फोटोत दिसणाऱ्या मुलाच्या रक्तात, नसामध्ये अभिनय भरलेला आहे. कुटुंबाचा अतिशय वाईट काळ या मुलाने पाहिलाय. एकदा घर सोडून गेलेला हा मुलगा पुन्हा घराच्या आठवणीने घरी परतला. कधी ड्रायव्हर, कोरस सिंगर, ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनही काम केलंय. पण खूप खडतर प्रयत्न केल्यानंतर या मुलाने स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण केली. कुणा फिल्मी कथेला मागे टाकेल अशी आहे महमूद अलीची गोष्ट. 29 सप्टेंबर रोजी महमूद अलीची 92 वी जयंती आहे.
29 सप्टेंबर 1932 साली लोकप्रिय अभिनेता मुमताज अली आणि लतीफुन्निसा यांच्या दुसऱ्या सुपुत्राचा या दिवशी जन्म झाला. त्या मुलाचं नाव आहे महमूल अली. मुमताज अली प्रेमाने त्यांना अन्नू या नावाने हाक मारत असे. एवढंच नव्हे तर अन्नू म्हणजे महमूद आला लकी मानत आणि ते पुढे ते अधोरेखित झालं. तसेच महमूद हे देशातील पहिला बोलता सिनेमा 'आलम आरा' सिनेमाच्या रिलीजनंतर एक वर्षांनी जन्माला आले होते. योगायोग असा आहे की, मुमताज अली यांचा जन्म मूक सिनेमा 'राजा हरिशचंद्र' हा सिनेमा पडद्यावर येण्याअगोदर झाला होता.
नंतर वेळ अशी आली की, ज्या मुलावर सर्वाधिक विश्वास होता त्यानेच त्यांचं मन तोडलं. जो बाप मुलाच्या जन्मावर इतका खूष होता. त्याच विवाहित मुलाने बापाच्या कानाखाली लगावली. महमूद-मॅन ऑफ मेनी मूड्स या पुस्तकाचे लेखक हनीफ जावेरीने याबाबत खुलासा केला आहे. या पुस्तकात म्हटलं आहे की, मुमताज अली कठीण प्रसंगातून जात होते. या काळात कोठ्यांवर जाणे, दारू पिणे हा त्यांचा दिनक्रम बनला होता.
या व्यसनामुळे संपूर्ण घराची वाताहात झाली. भांडी, बायकोची महागडज साडी असं करत हळू हळू सगळंच विकून टाकलं. घरातील संपूर्ण जबाबदारी महमूदच्या खांद्यावर आली. मिळेल ते काम करत गेले. 1953 साली मीन कुमारीची बहिण मधुसोबत लग्न देखील केलं. पण या सगळ्यात जबाबदाऱ्या अधिक वाढत गेल्या. वडिलांकडून होणार त्रास आणि या जबाबदाऱ्या यामध्ये महमूद पार अडकले होते.
पण नंतर एक दिवस असा आला ज्या दिवशी महमूद घरी होते. तेव्हाच वडील दारुच्या नशेत घरी आले आणि लतीफुन्निसाला मारू लागले. महमूदसाठी हे सहन करणं कठीण झालं होतं. वडिलांना खूप थांबवूनही ते मारणं थांबवत नाही. अचानक 'अन्नू' म्हणजे महमूद यांनी आपल्या वडिलांच्या जोरदार कानाखाली लगावली. यानंतर घरात एक शांतता पसरली पण नंतर जे झालं त्याने महमूद यांना आतून पूर्णपणे तोडून ठेवलं होतं.
यानंतर आईने महमूद यांना जोरदार कानाखाली लगावली. आणि तेव्हाच घरातून निघून जायला सांगितलं. त्याचवेळी महमूद यांची पत्नी गरोदर होती. महमूद यांनी तेव्हा ड्रायव्हरची नोकरी केली. महमूदला याकाळात खूप त्रास झाला. छोट्या भूमिका करा. अनेक वर्षांचा संघर्ष 1959 मध्ये संपला. 'छोटी बहन' हा चित्रपट प्रदर्शित झाला, तो सुपरहिट ठरला आणि त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. या अभिनेत्याला बॉलिवूडचा 'किंग ऑफ कॉमेडी' ही पदवी मिळाली आणि त्याच्या नावावर चित्रपटही विकले जाऊ लागले. 23 जुलै 2004 रोजी हा हसरा कलाकार हे जग सोडून गेला.