sonia gandhi

...आणि सोनिया गांधी भडकल्या

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संतापाचा पारा आज लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अडवाणी यांनी 'यूपीए -2 सरकार अवैध' असल्याचे म्हटले आणि शांत वाटणाऱ्या सोनिया गांधी यांनी आपला वृद्रावतार दाखवला. काँग्रेसने प्रती हल्लाबोल केल्यानंतर अडवाणी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.

Aug 9, 2012, 01:48 AM IST

संजय दत्तांचा लाळघोटेपणा, जय सोनियाचा नारा

नेहरू-गांधी घराण्यासमोर लाळ घोटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची कमी नाही आहे. सोनिया गांधी यांना खूप करण्यासाठी काँग्रेसचे काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी आज कहरच केला. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेताना संजय दत्त यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रबरोबर जय सोनियाचा नारा दिला.

Jul 31, 2012, 09:09 PM IST

पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.

Jul 30, 2012, 04:44 PM IST

काय झालं काँग्रेस-राष्ट्रवादीत डील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी अखेर दूर झालीय. पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतला तिढा अखेर सुटला. ‘यूपीए’मध्ये अधिक समन्वय असावा, ही पवारांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आलीय.

Jul 26, 2012, 07:54 AM IST

पवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?

शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.

Jul 25, 2012, 12:39 PM IST

मोठ्या 'जबाबदारी'साठी युवराज सज्ज!

राहुल गांधींनी मोठी जबाबदारी स्विकारावी, अशी काँग्रेस नेत्यांकडूनच होणाऱ्या मागणीबद्दल आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी मौनव्रत तोडलंय. आपण लवकरच पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्विकारणार असल्याचं सुतोवाच आज खुद्द ‘युवराजां’नी केलंय.

Jul 19, 2012, 12:36 PM IST

पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडची साथ

अशोक चव्हाणांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारली आहे. अशोक चव्हाणांना एकटे पाडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अशोक चव्हाण समर्थक आमदार सोनियांकडे तक्रार करणार होते.

Jul 11, 2012, 01:22 PM IST

विधान परिषदेसाठी कोण असतील काँग्रेस उमेदवार?

आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.

Jul 8, 2012, 12:37 PM IST

पूरग्रस्त असामसाठी ५०० कोटी

असाममध्ये ब्रहृपूत्र नदीला पूर आल्याने आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसला. यात कोट्यवधी रूपयांची हानी झाली. पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधाना डॉ. मनमोहनसिंग यांनी ५०० कोटी रुपयांची अस्थायी मदत जाहीर केली आहे.

Jul 2, 2012, 07:49 PM IST

'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'

'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.

Jun 30, 2012, 11:59 AM IST

...अशी झाली मुखर्जींच्या नावाची घोषणा

शुक्रवारचा दिवस दिल्ली दरबारी धावपळीचा ठरला. सकाळपासून ते प्रणव मुखर्जींची उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात…

Jun 16, 2012, 08:30 AM IST

'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 14, 2012, 02:36 PM IST

प्रणव मुखर्जींचा काबूल दौरा रद्द

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा काबुल दौरा रद्द झालाय. 14 जूनला प्रणव मुखर्जी काबूलच्या दौ-यावर जाणार होते. मात्र ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आलाय. सोमवारी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

Jun 12, 2012, 11:46 AM IST

पंतप्रधानांवरचे आरोप तथ्यहीन- सोनिया गांधी

दिल्लीत आज झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधींनी टीम अण्णा आणि विरोधकांवर पलटवार केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण करत सरकार आणि काँग्रेसवरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा सोनियांनी केला.

Jun 4, 2012, 01:48 PM IST

कोण करतंय सोनियांची बदनामी?

अण्णा हजारेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात सोनिया आणि राहूल गांधींची बदनामी करणारी पुस्तकं वाटण्यात येतात. पण, अण्णांना मात्र याचा थांगपत्ताही नसतो. ही घटना उघडकीस आलीय भंडाऱ्यामध्ये.

May 16, 2012, 06:37 PM IST