sonia gandhi

सोनिया गांधी - काँग्रेस ज्यांच्यावर अवलंबून

फोर्ब्सच्या २०१३ सालच्या जगातील सर्वात जास्त शक्तीशाली महिलांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २१व्या क्रमांकावर होत्या. त्यात राजकारणातील तिसऱ्या शक्तीशाली नेत्या. फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधी नवव्या स्थानी होत्या.

Apr 4, 2014, 07:48 PM IST

राहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..

Apr 4, 2014, 11:50 AM IST

गांधी परिवार आणि रायबरेली मतदारसंघाचं अतूट नातं

गांधी परिवार आणि रायबरेली मतदारसंघाचं अतूट नातं आहे. नेहरु आणि गांधी परीवाराच्या सत्तेची साक्षीदार असलेली रायबरेलीवर एक रिपोर्ट पाहूया.

Apr 3, 2014, 08:30 AM IST

९ करोडपैंकी सोनियांनी राहुलला दिलं ९ लाखांचं कर्ज

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. आपल्याकडे एकूण ९ करोड २८ लाख ९५ हजार रुपये असल्याचं सोनियांनी जाहीर केलंय.

Apr 2, 2014, 08:16 PM IST

सोनियांवर फुलांची उधळण; राहुलची वरुण गांधींकडून स्तुती

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसभवनमध्ये होमहवन केल्यानंतर सोनिया यांनी आपला अर्ज दाखल केलाय. रायबरेलीच्या जनतेनं नेहमीच भरभरुन प्रेम दिल्याचं यावेळी सोनिया गांधींनी सांगितलं.

Apr 2, 2014, 03:38 PM IST

काँग्रेसचा जाहीरनामा विकास मॉडेल - सोनिया गांधी

युपीएच्या काळात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. काँग्रेसचं विकास मॉडेल सर्वोत्तम आहे. जाहीरनाम्यासाठी 10,000 लोकांशी चर्चा केली. त्यातून हा जाहीर तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा 2014 च्या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Mar 26, 2014, 03:16 PM IST

अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी

अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी

Mar 26, 2014, 02:16 PM IST

काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.

Mar 8, 2014, 10:18 PM IST

सोनिया गांधीना `दस नंबरी` - मोदी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीचं टार्गेट आहे ते काँग्रेस. त्यातही सोनिया गांधी आणि राहुल गांधी. मोदी देशात कुठंही गेले की, भाषणात वेगवेगळी विशेषणं लावून गांधी घराण्यावर जोरदार हल्ला करतात. राहुल गांधींना कधी `शहेजादा` तर सोनिया गांधीना `दस नंबरी` संबोधतात.

Mar 1, 2014, 11:00 AM IST

मोदी-पवार जवळीक : मुख्यमंत्री सोनियांना भेटले

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाशही यावेळी हजर होते.

Feb 3, 2014, 05:52 PM IST

विषाची शेती करणाऱ्यांना सत्ता देऊ नका - सोनिया

विषाची शेती करणाऱ्या आणि विभाजनाचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलंय. कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यात झालेल्या रॅलीमध्ये त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांनी मोदींवर आणि भाजपवर कडाडून टीका केली.

Feb 1, 2014, 11:05 PM IST

<b><font color=red>काय बोलले राहुल गांधी</font></b>

राहुल गांधी यांचे एआयसीसीतील भाषण लाइव्ह....

Jan 17, 2014, 04:18 PM IST

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज - सोनिया गांधी

काँग्रेसवर अनेक आरोप झाले आहेत आणि होत आहेत. संकटे आली मात्र तरीही पक्षाने अनेक संकटे पचवली आहेत. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या लढाईसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.

Jan 17, 2014, 12:52 PM IST

तेलंगणात ‘सोनियाम्मा’ची मूर्ती तयार मंदिरही लवकरच

आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.

Jan 9, 2014, 04:10 PM IST

प्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?

प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.

Jan 8, 2014, 08:01 AM IST